घरदेश-विदेशतुमचं 'या' ७ बँकेत खातं आहे तर सावधान! १ एप्रिलपासून असणार नवे...

तुमचं ‘या’ ७ बँकेत खातं आहे तर सावधान! १ एप्रिलपासून असणार नवे नियम लागू

Subscribe

देशात १ एप्रिल २०२१ पासून काही ठराविक बँकांचे पासबुक आणि चेकबुक अवैध होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बँकांच्या यादीत अशा बँकांचा समावेश आहे ज्यांचे अन्य बँकांमध्ये विलीनीकरण झाले असून ते १ एप्रिल २०१९ आणि १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आले आहे. या बँकांच्या यादीत देना बँक, विजया बँक, कॉरपोरेशन बँक, आंध्रा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनाइटेड बँकसह इलाहाबाद बँक आहे.

कोणत्या बँकेचे कोणत्या बँकेत झाले विलीनीकरण

देना आणि विजया बँक या दोन बँका बँक ऑफ बडोदामध्ये १ एप्रिल २०१९ पासून विलीन झाल्या आहेत. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये विलीन झाल्यात, तर सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलनीकरण युनियन बँक ऑफ इंडिया बँकेत आणि अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलीन झाले आहे.

- Advertisement -

PNB सह BOB बँकेने केलं ग्राहकांना अलर्ट

इतर बँकेत विलीनीकृत झालेल्या बँकेच्या ग्राहकांचा खाता क्रमांक, आयएफएससी, एमआयसीआर कोड, चेकबुक, पासबुक इत्यादींमध्ये बदल करण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा बँकेने यापूर्वीच त्यांच्या ग्राहकांना सावध केले आहे की, OBC, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक और देना बँकेच्या ग्राहकांकडे सध्या असणारे चेकबुक हे केवळ ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध असणार आहे. याप्रमाणेच विलीन झालेल्या इतर बँकांचे ग्राहक त्यांच्याकडे असणारे चेकबुक, पासबुक यांचे कामकाज हे फक्त ३१ मार्चपर्यंतच करू शकणार आहे. तर १ एप्रिलपासून नवे पासबुक आणि चेकबुक ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे बँकांकडून सांगितले जात आहे.

सिंडिकेट बँकेच्या बाबतीत कॅनरा बँकेने असे सांगितले की, सिंडिकेट बँकेचे सध्या असणारे चेकबुक हे ३० जून २०२१ पर्यंत वैध असणार आहे. जर आपण विलीनीकृत बँकांचे ग्राहक असाल तर मोबाइल नंबर, पत्ता, नॉमिनी वगैरे तपशील वेळेत अपडेट करून घ्या, जेणेकरून यापुढे त्रास होणार नाही आणि एसएमएस किंवा ईमेलद्वारे तुम्हाला आवश्यक माहिती मिळणं शक्य होईल.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -