घरताज्या घडामोडीपिकांच्या पेरण्यायोग्य पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात, कृषीमंत्री दादा भुसेंचे शेतकऱ्यांना आवाहन

पिकांच्या पेरण्यायोग्य पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात, कृषीमंत्री दादा भुसेंचे शेतकऱ्यांना आवाहन

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे राज्यात पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्या काहीशी लांबणीवर पडणार आहेत. परंतु पाऊस लांबला तरी, शेतकऱ्यांना आताच खरीपाच्या पेरण्यांची घाई करू नये. पिकांच्या पेरण्यायोग्य पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

पिकांच्या पेरण्यायोग्य पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात

दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पुण्यात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची १०७ वी बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, खरीप हंगामातील पेरण्यासाठी ३० जूनपर्यंतचा कालावधी योग्य असतो. त्यामुळे या हंगामातील पिकांच्या पेरण्या लांबल्या म्हणता येणार नाहीत. येत्या आठवडाभरात पाऊस पडल्यास, त्या वेळेवरच होतील, असं भुसे म्हणाले.

- Advertisement -

खरिपाचा हंगाम सुरु होण्यापूर्वीच येईल

यंदाच्या पावसाळ्यात किमान ९७ तर, कमाल १०५ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा पाऊससुद्धा वेळेपूर्वी म्हणजेच खरिपाचा हंगाम सुरु होण्यापूर्वीच येईल, खरीपाच्या पेरण्यांसाठी बियाणे, रासायनिक खते आदींबाबत वेळोवेळी आढावा घेऊन, त्याबाबत नियोजन केले जात आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीन व कापूस या दोन पिकांची सुमारे ६० टक्के क्षेत्रात लागवड केली जाते. या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी उत्तम मॉडेल तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याच पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. यामुळे खरीप हंगामातील बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरेसा साठा शिल्लक राहिला असल्याचे भुसेंनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग, आमदारांना मुंबईत उद्या हजर राहण्याचे आदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -