घरताज्या घडामोडीकार्यकारी अभियंत्यांनी कामातून घडवले माणुसकीचे दर्शन

कार्यकारी अभियंत्यांनी कामातून घडवले माणुसकीचे दर्शन

Subscribe

पद कोणतेही असो त्या पदावर बसल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किती न्याय मिळतो यावर त्या पदाची शान ठरत असते याचाच प्रत्यय सार्वजनिक बांधकामाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कामातून आला आहे. शहरातील पाच नंबर या मराठी शाळेची झालेली पडझड बघून अनेकांचे मन हेलावून जात होते.

पद कोणतेही असो त्या पदावर बसल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किती न्याय मिळतो यावर त्या पदाची शान ठरत असते याचाच प्रत्यय सार्वजनिक बांधकामाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कामातून आला आहे. शहरातील पाच नंबर या मराठी शाळेची झालेली पडझड बघून अनेकांचे मन हेलावून जात होते. त्याला कारण होते शाळेत शिक्षण घेत असलेली लहान लहान मुले छप्पर डोक्यावर आले असतना. ही मुले जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत होती पण कोणालाच पाझर फुटत नव्हता. मात्र मुख्याध्यापिका शुभलता सुकी याच्या एका निवेदनातून कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ शाळेचे छप्पर दुरूस्त करत डागडुजी ही केली. त्यामुळे विद्यार्थी व पालक शिक्षक यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सावंतवाडी शहरातील पाच नंबर शाळा ही पोलीस लाईन जवळ आहे. शहरातील सर्व शाळा या जिल्हा परिषद च्या अखत्यारित येतात पण ही शाळा त्याला अपवाद असून ऐकमेव शाळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते .त्या मुळे या शाळेकडे सतत दुर्लक्ष होत होते.शाळेचे छप्पर दुरूस्त नाही.शाळे जवळ झाड असल्याने ते आज पडते कि उद्या अशी स्थीती होती. त्यामुळे पालक आपल्या मुलांना या शाळेत पाठवताना अनेक वेळा विचार करत होते.तर या शाळेत विद्यार्थ्यां बरोबर ज्ञानदान करणारे शिक्षक ही जीव मुठीत घेऊन आपले रोजचे काम करत होते.न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न सर्वानाच पडत असल्याचे दिसत होते.

- Advertisement -

अनेकांना ही शाळा सार्वजनिक बांधकाम कडे येते हे ही माहिती नव्हते मात्र सध्याच्या मुख्याध्यापिका शुभलता सुकी यांनी हे शोधून काढत बांधकाम विभागा सोबत पत्रव्यवहार सुरू केला गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक वेळा पत्र पाठवली पण कोणीही दखल घेतली नाही.पण अखेर त्यांना न्याय मिळाला तो एका महिले कडूनच कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण या अलिकडेच सावंतवाडीत नियुक्त झाल्ये आहेत.त्यातच त्या स्थानिक असल्याने आणि त्याच रस्त्याने ये जा करत असल्याने.त्यांनी शाळेची स्थिती बघितली आणि शाळा दुरूसतीचा निर्णय घेतला आणि आज ती शाळा दुरूस्त करून मुलांच्या सेवेतही आली आहे.

त्यामुळे विद्यार्थी पालक यांनीही सुटकेचा निश्वास सोडलाच आहे तसेच शिक्षकांनी ही शाळा दुरूस्ती झाल्याने सार्वजनिक बांधकाम च्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांचे आभार मानले.काम झाल्यानंतर क्वचितच आभार मानले जातात पण शाळेच्या मुख्याध्यापिका शुभलता सुकी यांनी बांधकाम च्या कार्यालयात जाऊन आभार मानत अशक्यप्राय काम करून दिल्याची आठवण करुन दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -