घरमहाराष्ट्रनगरमध्ये २८ डिसेंबरला महापौर-उपमहापौराची निवड

नगरमध्ये २८ डिसेंबरला महापौर-उपमहापौराची निवड

Subscribe

नगरच्या महापालिकेसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आता नाशिक विभागीय महसूल आयुक्तांनी २८ डिसेंबर रोजी नूतन महापार आणि उपमहापौर निवडीसाठी नवनिर्वाचित नगर सेवकांच्या विशेष सभेचे आयोजन केले आहे.

नगरच्या महापालिकेसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आता नाशिक विभागीय महसूल आयुक्तांनी २८ डिसेंबर रोजी नूतन महापार आणि उपमहापौर निवडीसाठी नवनिर्वाचित नगर सेवकांच्या विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेकरता आयुक्तांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी तसेच मनपाचे प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महापौर, उपमहापौर निवडीच्या सभेची तारीख आता जाहीर झाल्याने महापालिकेत राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.

९ तारखेला झालेली निवडणूक 

९ डिसेंबर रोजी मतदान आणि १० डिसेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर मनपा प्रशासनाने सादर केलेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या राजपत्रात महापालिका निवडणुकीचा निकाल आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी जाहीर झाली. त्यावेळी मनपा प्रशासनाने महापौर – उपमहापौर निवडीच्या सभेकरता तातडीने प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव नाशिकला विभागीय महसूल आयुक्तांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता देऊन आयुक्तांनी २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापौर – उपमहापौर निवनडीसाठी सभा बोलावण्याचे घोषित केले आहे. या सभेकरता जिल्हाधितकारी व्दिवेदी यांची पीठासीन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवसेनेला सर्वाधिक मतं 

दरम्यान, मनपा निवडणुकीत विजयी झालेल्या विविध राजकीय पक्षांनी आपल्या गटाच्या नोंदणीचे काम सुरू केले असून मंगळवारपर्यंत शिवसेना (२४), भाजपा (१४), काँग्रेस (५) आणि बहुजन समाज पार्टी (४) या पक्षांनी नाशिक येथे विभागीय महसूल कार्यालयात आपल्या गटनेत्यांच्या नावासहीत गटांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांची गटनोंदणी आज, बुधवारी करण्यात आली आहे. त्यामुळे गट नोंदणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आता सत्ता स्थापनेच्या दृष्टीने राजकीय हालचालांना वेग आल्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -