घरमहाराष्ट्रनको असलेल्या सूनेचा सासरी छळ

नको असलेल्या सूनेचा सासरी छळ

Subscribe

अहमदनगर येथे एका तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लग्नाची जबरदस्ती करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीशी लग्न केल्यानंतर या तरुणांने आणि त्याच्या आई - वडिलांनी सूनेचा छळ करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पती, सासू - सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर येथे मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लग्नाची जबरदस्ती करणाऱ्या तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणांने त्या तरुणीशी जबरदस्ती लग्न केले. मात्र लग्नानंतर तिचा छळ करणाऱ्या पती आणि सासू – सासऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लग्न जमविण्याच्या उद्देशाने घरी आलेल्या एका तरूणाने संबंधित युवतीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करून अश्लिल चित्रीकरण केले. या चित्रीकरणाच्या आधारे युवतीला लग्न करण्यास भाग पाडले. मात्र लग्नानंतर या युवतीचा सासरी छळ होऊ लागल्याने अखेरीस युवतीच्या नातेवाईकांनी थेट राहुरी पोलीस ठाण्यात संबंधित मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार केली आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

राहुरी तालुक्यातील एका गावातील भटके जाती समाजातील असणारा हा युवक लग्न जमविण्याच्या हेतूने सदर मुलीच्या घरी आला होता. मात्र लग्न निश्चित होण्यापूर्वी हा तरूण सदरच्या युवतीला घेऊन शनिशिंगणापूरला गेला. तेथे एका लॉजवर तरूणीला नेऊन त्यांने तिच्यावर अत्यचार केला. यावेळी या तरूणाने युवतीचे अश्लिल चित्रीकरण करत या चित्रीकरणाच्या आधारे त्याने मुलीस ब्लॅकमेल करून सदरचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्या बरोबर लग्न करण्याची मागणी केली. त्यानंतर अखेरीस राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे संबंधित भटक्या समाजाती जात पंचायत बोलावण्यात आले. जात पंचायतीने सदर मुलीस त्या मुलाबरोबरच लग्न करण्यास भाग पाडले. जात पंचायतीच्या आदेशानुसार शेवटी त्या मुलीने लग्न केले. मात्र लग्नानंतर सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी ही मुलगी आपल्या माहेरी आई-वडिलांकडे परत आली. तिने हा सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. अखेर मुलीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदरचा मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.


वाचा – आणि पत्नी पॉर्नस्टार असल्याचा त्याला झाला भास!

- Advertisement -

वाचा – वयोवृद्ध आईचा छळ करणाऱ्या मुलाला कोर्टाचा दणका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -