घरदेश-विदेशदशकानंतर ब्रिटिश एअरवेज उतरणार पाकिस्तानात

दशकानंतर ब्रिटिश एअरवेज उतरणार पाकिस्तानात

Subscribe

ब्रिटिश एअरवेज जून २०१९ मध्ये पाकिस्तानात आपली सेवा पुन्हा सुरु करणार आहे. कंपनीने नुकतीच याची घोषणा केली आहे. दहा वर्षांनी बंद असलेली सेवा आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

ब्रिटिश एअरवेज आपल्या विमानांची सेवा पाकिस्तानात पुन्हा सुरु करणार आहे. तब्बल दहा वर्षांनी ही सेवा सुरु होणार आहे. ही सेवा सुरु करण्याची अधिकृत घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. कपंनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही विमानसेवा जून २०१९ पासून सुरु केली जाणार आहे. लंडन हीथ्रो विमानतळापासून ते इस्लामाबाद विमानतळा पर्यंत ही सेवा सुरु करण्यात येण्यात आहे. ब्रिटिश एअरवेजचे अधिकारी थॉमस ड्रू यांनी ट्विटरवरून व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. या विमानसेवेमुळे ब्रिटन आणि पाकिस्तानाचे संबध सुधारतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

सुरक्षेच्या प्रश्नांमुळे बंद केली होती सेवा

पाकिस्तानात सुरक्षिततेला धोका असल्यामुळे ब्रिटिश एअरवेजने आपली विमानांची सेवा बंद केली होती. सप्टेंबर २००८ मध्ये पाकिस्तानच्या मॅरियट हॉटेलमध्ये बॉम्ब हल्ला झाला होता. या घटनेत ५० जणांनी आपले प्राण गमावले तर २५० नागरिक जखमी झाले होते. कंपनीने प्रकाशित केलेल्या प्रेस नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार आठवड्यातून तीन दिवसांमध्ये ही विमानसेवा सुरु असणार आहे. या विमानांचे रिटर्न भाडे ८९ हजार रुपये इतके असणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

Thank you for coming back to pakistan we welcome you #britishairways

A post shared by The real pakistan (@the_real__pakistan) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -