घरमहाराष्ट्रदेशात सध्या बनवाबनवी आणि फसवाफसवी सुरु - अजित पवार

देशात सध्या बनवाबनवी आणि फसवाफसवी सुरु – अजित पवार

Subscribe

अजित पवार यांचा सरकारला टोला.

देशात सध्या बनवाबनवी आणि फसवाफसवी सुरु असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका जिल्हास्तरिय पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार?

या कार्यक्रमात बोलताना ते अंगणवाडी सेविकांना उद्देशून म्हणाले की, ‘तुम्ही अंगणवाडी भगिनींनी मनामध्ये आणलं तर पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू. फक्त तुम्ही मनात आणायला हवं. सहा महिन्यात निवडणूका लागणार आहेत. या राज्यकर्त्यांचे हे शेवटचं वर्ष आहे. जनता जनार्दन सर्वस्वी आहेत, ते ठरवतीलच. सेवकांची मेहनत आणि त्यांच्या कुटुंबाची साथ या जोरावरच चांगले काम होत आहे. सगळ्या गोष्टींची सरकारकडे अपेक्षा करणे बरोबर नाही. सरकार आणि दानशूर लोकांच्या मदतीने कामे मोठी व्हायला हवीत’. लहान मुलांना घडविताना अंगणवाडी सेविकांना सुविधा द्यायला हवी, असे आवाहान पवार यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, सभापती राणी शेळके, प्रवीण माने, सुजाता पवार, सुरेखा चौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

‘सेवक शब्दाचा अर्थच त्यांना कळला नाही’

कार्यक्रमात बेटी बचाव व बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत गुड्डा-गुड्डी फलकाचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांनी स्वतःला प्रधानसेवक, मुख्यमंत्र्यांनी मुख्यसेवक म्हणून घ्यायला सुरुवात केली. मात्र, त्यांच्या वागण्यात कोठेच सेवकांचा भाव दिसत नाही. सेवक शब्दाचा अर्थच यांना कळला नाही. या उलट आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात असल्याचीही टीका अजित पवार यांनी सरकारवर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -