घरदेश-विदेश'अल्ला किंवा राम मतदानासाठी येणार नाहीत'

‘अल्ला किंवा राम मतदानासाठी येणार नाहीत’

Subscribe

'मतदान करायला राम किंवा अल्ला येणार नाहीत, तर जनताच सरकार निवडून देणार आहे', अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.

अयोध्या राममंदिर प्रकरणावरुन अनेक राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असाताना, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘मतदान करायला राम किंवा अल्ला येणार नाहीत, तर जनताच सरकार निवडून देणार आहे’, असं म्हणत फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी भाजप सरकारला टोला हाणत फारुख म्हणाले, ‘२०१९ च्या निवडणुका राममंदिराच्या मुद्द्यावर जिंकू शकू असं यांना वाटतंय. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना प्रभू राम मदत करणार नाहीत. राम किंवा अल्ला मतदान करायला येणार नसल्याचं यांनी ध्यानात ठेवावं.’

- Advertisement -

तर नुकतंच शिवसेनेचे संजय राऊत यांनीही राममंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. ‘राममंदिरप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत राहिलो, तर १ हजार वर्ष गेली तरी राममंदिर होणार नाही’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ‘उद्धव ठाकरेंच्या अयोध्या भेटीची तायारी पूर्ण झाली असून ते येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. तिथे जाऊन ठाकरे मोदजींना आणि भाजपला राममंदिराच्या आश्वासनाची आठवण करुन देतील’, असं रावते यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -