घरमहाराष्ट्र'मुलाचे सोडून अजित पवार कोणाचेच कौतुक करत नाहीत'

‘मुलाचे सोडून अजित पवार कोणाचेच कौतुक करत नाहीत’

Subscribe

अजित पवार हे मुलाचे सोडून कोणाचेच कौतुक करत नाहीत, असे म्हणत खासदार गिरीश बापट यांनी अजित पवार यांना चिमटा काढला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगतापसह कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले गिरीश बापट 

खासदार गिरीश बापट म्हणाले की, विरोधक वैतागले आहेत. त्यात दादा तर खुपच वैतागलेले आहेत. शेवटी इतके वर्ष सत्तेत राहण्याची सवय लागली, त्यांना आदर्श विरोधी पक्ष म्हणून काम करता येत नाही. कसं काम करायचं ते आमच्याकडून शिकावं. म्हणून मी व्यक्तिगत दादा असं म्हणून बोलणार नाही. राजकारणात काही पथ्य पाळलेली आहेत. पण ते विरोधी पक्षातील आहेत. त्यांनी आम्हाला आमच्या चुका दाखवणे,  त्याचे स्वागत करू. त्यांनी सूचना देणं याचेदेखील स्वागत करू. पण, प्रश्नही समजून घेतले पाहिजेत. जे तुम्हाला पंधरा वीस वर्षांत करता आले नाही. आम्ही ते पंधरा-वीस महिन्यात करून दाखवले. याचं त्यांनी कौतुक करायला हवं. मात्र, अजित पवार यांच्यासारखा माणूस कोणाचेच कौतुक करणार नाही, मुलाचं सोडून. त्यामुळे अवघड आहे, असा चिमटा अजित पवार यांना काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -