घरमहाराष्ट्रअजबच! एकाच उमेदवाराला वंचित आणि 'आप'कडून उमेदवारी

अजबच! एकाच उमेदवाराला वंचित आणि ‘आप’कडून उमेदवारी

Subscribe

आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतील एका उमेदवाराचे नाव वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतही आहे. त्यामुळे एकाच उमेदवाराला दोन पक्षांकडून उमेदवारी कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जागा वाटपाच्या कार्यक्रमात व्यग्र आहे. दरम्यान, सोमवारी आम आदमी (आप) पक्षाने पत्रकार परिषद घेऊन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आप ३५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यापैकी आठ उमेदवारांची नावे आपने जाहीर केले. यामध्ये कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघासाठी बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद गुरव यांना आपने उमेदवारी जाहीर केली. मात्र, वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीतही अनिल गुरव यांचे नाव आले आहे. त्यामुळे अनिल गुरव नेमक्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल गुरव वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार असल्याचे म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी

वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत आनंद गुरव यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना करविर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

- Advertisement -

आपच्या प्रसिद्धीपत्रात गुरव यांचे नाव

दरम्यान, आपने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रात देखील आनंद गुरव यांचे नाव आहे. हे प्रसिद्धपत्र आपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहे.

- Advertisement -

फेसबुकवर डॉ. आनंद गुरुव यांच्या नावाचे एक अकाउंट आहे. या अकाउंटवर आनंद गुरव वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याचे म्हटल आहे. याशिवाय त्या अकाउंटवरील पोस्टनुसार गुरव वंचित बहुजन आघाडीचे समर्थक असल्याचे समोर येत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -