घरमहाराष्ट्रAjit Pawar : त्यांची ती स्ट्रॅटेजी, मग आमची ती गद्दारी का? अजित...

Ajit Pawar : त्यांची ती स्ट्रॅटेजी, मग आमची ती गद्दारी का? अजित पवारांचा सवाल

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या काही राजकीय खेळींचा उलगडा केला आहे. त्यामुळे शरद पवार करतील ती स्ट्रेटजी आणि मग आम्ही करू ती गद्दारी कशी? असा प्रश्न अजित पवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून काका-पुतणे म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. पण अजित पवार मात्र पक्षातील जुन्या गोष्टींचा गौप्यस्फोट करताना पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा त्यांनी शरद पवार यांच्या काही राजकीय खेळींचा उलगडा केला आहे. त्यामुळे शरद पवार करतील ती स्ट्रॅटेजी आणि मग आम्ही करू ती गद्दारी कशी? असा प्रश्न अजित पवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे. (Ajit Pawar raised questions on Sharad Pawar political moves)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्यापासून ते आतापर्यंतच्या शरद पवारांच्या राजकीय खेळींवर सडकून टीका केली आहे. आज गुरुवारी (ता. 02 मे) अजित पवार म्हणाले की, 1978 साली महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते वसंतदादा पाटील यांचे सरकार होते. हे सरकार उत्तम पद्धतीने राज्याचा कारभार पाहत होते. परंतु, शरद पवारांनी (नाव न घेता) वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. त्यानंतर शरद पवारांनी पुलोदला घेऊन म्हणजेच, जनता पक्षाशी युती करून राज्यात सरकार बनवले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे काही ऐकले नाही. ज्या यशवंतरावांनी शरद पवारांना राजकारणात संधी दिली, त्याच यशवंतरावांचं शरद पवारांनी काहीच ऐकले नाही, अशी माहिती पुन्हा पवारांकडून देण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : मुख्यमंत्री शिंदेंना मुलाच्या विजयाचा विश्वास, शक्तिप्रदर्शनासह श्रीकांत शिंदेंनी भरला अर्ज

तर, 2014 सालीसुद्धा असाच एक प्रकार घडला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी पुण्यावरून मुंबईला निघालो होतो. मी मुंबईला पोहोचण्यापूर्वीच टीव्हीवर एक बातमी झळकली. प्रफुल्ल पटेल यांनी सिल्व्हर ओकच्याबाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी पटेल यांनी सांगितले की, आमचा भाजपाला बाहेरून पाठिंबा आहे. त्यावेळी शरद पवारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. मी मुंबईला येऊन विचारले की हे कसे झाले? तर त्यावर शरद पवार म्हणाले, ही स्ट्रॅटेजी आहे. आताच्या घटनेनंतर मला प्रश्न पडतो की, ते करतात ती स्ट्रॅटेजी आणि आम्ही करतो ती गद्दारी? मी केले तर ते वाट्टोळे कसे? असा सवाल अजित पवार यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

- Advertisement -

तसेच, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देत शरद पवारांनी त्यावेळी कशी खेळी केली या संदर्भात सांगितले. 1999 ला आम्ही काँग्रेसबरोबर सरकार बनवले. तर 2004 च्या निवडणुकीत आमचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. तेव्हा विलासराव देशमुख मला म्हणाले, ‘तुमचे मुख्यमंत्री कोण होणार आहेत? छगन भुजबळ, आर. आर. पाटील की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होणार? कारण आम्हाला सोनिया गांधी यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. उपमुख्यमंत्री कोणाला करायचे ते आपण ठरवू.’

परंतु. शरद पवारांनी काही दिवसांमध्ये आम्हाला सांगितले की आपण मुख्यमंत्रीपद सोडून देऊया. त्या बदल्यात चार मंत्रीपदे जास्त घेऊ. आपल्याला मुख्यमंत्रीपद नको. मी म्हटले हे सगळं कठीणच झाले आहे. पण शरद पवारांचा आदेश आम्ही ऐकला. त्यांच्या आदेशांवर कधीही आक्षेप घेतला नाही. मला कधी कधी वाटते आत्ता जो निर्णय घेतलाय तो मी 2004 सालीच घ्यायला पाहिजे होता. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा शरद पवारांच्या राजकीय खेळीचा उलगडा करत आपल्या काकांबद्दल म्हणजेच शरद पवार यांच्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पण त्यांच्या या टीकेला आता शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेतेमंडळी काय उत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Politics : माढ्यात नवा ट्विस्ट; कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी फडणवीसांची भेट अन्


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -