घरताज्या घडामोडीAjit Pawar : ही गावकी किंवा भावकीची निवडणूक नाही; अजित पवारांचा रोख...

Ajit Pawar : ही गावकी किंवा भावकीची निवडणूक नाही; अजित पवारांचा रोख कोणावर? वाचा सविस्तर

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारत राज्यातील महायुतीमध्ये सहभाग घेतला. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुटली असून अनेक आमदार आणि खासदारांनी अजित पवारांची साथ देत शरद पवारांची साथ सोडली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारत राज्यातील महायुतीमध्ये सहभाग घेतला. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुटली असून अनेक आमदार आणि खासदारांनी अजित पवारांची साथ देत शरद पवारांची साथ सोडली. तेव्हापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपसून अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्ही शरद पवारांच्या बाजूने असल्याचे सांगत अजितदादांवर टीका केली. अशातच पवार कुटुंबातीलही अनेकांनी अजितदादांवर टीका करत त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. याबाबत आज अजित पवारांनी भाष्य करत आपले मत स्पष्ट केले. (Ajit Pawar Talks On Pawar Family)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आपले अनेक नातेवाईक आपल्या विरोधात प्रचार करत आहेत, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर “ही गावकी किंवा भावकीची निवडणूक नाही आहे. देशाच्या 140 कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यापार्श्वभूमीवर आम्ही या निवडणुकीकडे पाहत आहोत”, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

- Advertisement -

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीत भाषण करताना ‘कुटुंबात मला एकटे पाडले जाईल, तुम्ही तरी मला साथ द्या’, अशी भावनिक हाक अजित पवारांनी बारामती दिली होती. अजित पवारांनी भावनिक हाक दिल्यानंतर पवार कुटुंबातील इतर सदस्य सुप्रिया सुळे यांच्या म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत.

युगेंद्र पवार, सुनंदा पवार, सई पवार राजेंद्र पवार आणि त्यानंतर आता शर्मिला आणि श्रीनिवास पवार प्रचारासाठी बाहेर पडले आहेत आणि त्यांनी थेट अजित पवारांना टीका करायला सुरुवात केली. रोहित पवार तर आधीपासूनच काकांच्या विरोधात भूमिका घेताना दिसले आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीही त्यांच्यावर टीका केली होती. “पंचवीस वर्षे मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचे! पुढच्या काही वर्षांत दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही”, अशा जळजळीत शब्दांत श्रीनिवास पवार यांनी टीका केली होती.


हेही वाचा – OMAR ABDULLAH : जम्मू – काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही; ओमर अब्दुल्ला यांचा विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -