घरदेश-विदेशइर्शाळवाडीतील ग्रामस्थांचे पुनर्वसन करा, मुख्यमंत्र्यांच्या 'सिडको'ला सूचना

इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचे पुनर्वसन करा, मुख्यमंत्र्यांच्या ‘सिडको’ला सूचना

Subscribe

मुंबई | इर्शाळवाडीतील ग्रामस्थांनचे कायम स्वरुपीचे पुर्नवसन करण्यासाठी सिडकोला सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेची थोडक्यात माहिती माध्यमांना दिली.

दुर्घटनेतील ग्रामस्थानचे पुर्नवसन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “कॅबिनेटमध्ये चीफ सेक्रेटरी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. इर्शाळवाडीतील ग्रामस्थांनच्या राहण्याची सध्या सोय केली आहे. या ग्रामस्थांनचे कायम स्वरुपीचे पुर्नवसन करण्याच्या सूचना देखील सीडकोला दिल्या आहेत. यासाठी सिडकोला तत्काळ जागा शोधून देऊ आणि सीडकोच्या माध्यमातून सर्व घरे वार फुटींवर बांधली जातील आणि ही घरे दुर्घटनाग्रस्तांना देता येईल,” अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

राज्य सरकार निर्णयाच्या पाठीशी केंद्र सरकार असेल

इर्शाळवाडी दुघटनेसंदर्भात पंतप्रधानांंनी काय म्हणाले?, “राज्य सरकार लोकांसाठी जे निर्णय घेईल, त्याबरोबर केंद्र सरकार पूर्ण ताकतीने उभे राहिली”, असे पंतप्रधान म्हणाल्याचे मुख्यमत्र्यांनी सांगितले.  पंतप्रधान मोदींसोबत शिंदे कुटुंबियांनी सदिच्छा भेटीसंदर्भतील प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधानांना भेटायची इच्छा सर्वांनाच असते आणि ती भेट झाली याचा आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

हेही वाचा – इर्शाळवाडीसारख्या दुर्घघटना टाळण्याकरिता उद्धव ठाकरेंनी सुचविल्या उपाययोजना

- Advertisement -

सर्वांनी एकत्र यावे 

या दुर्घटनेवेळी सर्वांनी एकत्र यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा देत मुख्यमंत्री म्हटले, “अशा दुर्घटनेत सत्ताधारी किंवा विरोधक अशी भूमिका न घेता. लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि कायम स्वरुपीचा तोडगा काढला पाहिजे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -