घरमहाराष्ट्रअलिबाग : पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

अलिबाग : पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

Subscribe

अलिबागमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस मुख्यालयामधील अधिकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अलिबागमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलीस मुख्यालयामधील अधिकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेकर (५०) असे त्यांचे नाव असून त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, प्रशांत कणेकर यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप स्पष्ट कारण कळलेले नाही.

नेमके काय घडले?

प्रशांत कणेकर हे तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून अलिबाग येथे अर्ज शाखेरत रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली होती. रजेनंतर ते पुन्हा एकदा १५ ऑगस्टला कामावर रुजू झाले होते. दरम्यान, त्यांनी १६ ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंढरपुर : दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -