घरमहाराष्ट्रAmravati : पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा चिघळला; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज

Amravati : पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा चिघळला; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज

Subscribe

अमरावती : पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशाद्वाराचा मुद्दा चिघळला आहे. गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या दिला होता. मात्र आज प्रशासनाच्या निर्णयानंतर ग्रामस्थांनी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. (Amrawati Pandhari Khanampur village entrance issue acrimonious Lathi charge on protesters by police)

हेही वाचा – Nilesh Lanke : राजकारण क्षणाक्षणाला बदलत असतं, शरद पवारांच्या पक्षात जाण्याबाबत संदिग्धता

- Advertisement -

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावात महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरून गावातील दोन गटांमध्ये वाद सुरू होता. गावात कमान उभारायची की नाही, यावरून एकमत होते नव्हते. मात्र, हा निर्णय होण्यापूर्वीच एका गटाने परस्पर कमान उभारली. त्यानंतर या कमानीला नाव काय द्यायचे यावरून दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दरबारात होता. परंतु, चार ते पाच दिवसांपूर्वी गावातील एका गट सुरुवातीला अमरावतीच्या दिशेने निघाले मात्र त्यानंतर त्यांनी मंत्रालयाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गावातील शिष्टमंडळ आणि पोलीस अधीक्षकांची तीन दिवसांपासून बैठक सुरू होती.

हेही वाचा – Pankaja Munde : पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता…; मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

- Advertisement -

मात्र गेल्या दिवसांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी विभागीय आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीवला पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांवर पाण्याच्या फवाऱ्याने मारा केला. त्यामुळे सध्या याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -