घरमहाराष्ट्ररात्रीस चर्चा चाले? अजित पवारांच्या अनुपस्थितीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये खलबतं

रात्रीस चर्चा चाले? अजित पवारांच्या अनुपस्थितीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये खलबतं

Subscribe

गेल्या तीन दिवसांपासून शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराच्या आड तासभर चर्चा होताना पाहायला मिळत आहे. पण नव्यानेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांना या चर्चांपासून लांब का ठेवण्यात येत आहे? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा व्हायला लागल्या आहेत.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार हा आता आणखी लांबणीवर पडल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या समर्थनातील 8 आमदारांना मंत्रीपद दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकीकडे सरकारमध्ये नव्याने सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी वजनदार खाती मिळावी, यासाठी अजित पवार आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस यांचे आमदार मंत्रीपदी स्वतःचे नाव येण्यासाठी लॉबिंग करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चढाओढीच्या राजकारणात मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. (An hour-long discussion between Eknath Shinde and Devendra Fadnavis in absence of Ajit Pawar)

हेही वाचा – व्हिप, आमदारांचे निलंबन, राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांवर कारवाई… राहुल नार्वेकर काय म्हणाले ?

- Advertisement -

नाराज असलेल्या आमदारांची समजूत काढताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नाकीनऊ आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून हे दोघेही तास-तासभर बंद दाराच्या आड एकमेकांसोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहे. पण नव्यानेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांना या चर्चांपासून लांब का ठेवण्यात येत आहे? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा व्हायला लागल्या आहेत.

काल (ता. 10 जुलै) रात्री 11 च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली. तब्बल तीन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण या चर्चेला अजित पवार हे काही वेळासाठीच उपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार हे काही वेळच फक्त या चर्चेमध्ये सहभागी होवून नंतर देवगिरीवर का परतले? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रात्री झालेली ही बैठक मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत होती, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

साधारणतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री 11.15 वाजताच्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहचले. त्यानंतर ते 2 वाजून 10 मिनिटांनी बाहेर पडले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे 12 वाजता बैठकीसाठी पोहचले, पण त्याठिकाणी काही वेळ थांबूनच ते तिथून बाहेर पडून देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर अजित पवार यांच्या अनुपस्थितीत एक तास आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे आता अजित पवारांच्या अनुपस्थितीत या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर आता या तीन चाकी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -