घरमहाराष्ट्रसातव्या दिवशी अण्णांचे उपोषण मागे; सर्व मागण्या मान्य

सातव्या दिवशी अण्णांचे उपोषण मागे; सर्व मागण्या मान्य

Subscribe

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अखेर सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य केल्या तसंच लिखित आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाली. ६ तासांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले आहे.

प्रदिर्घ चर्चेनंतर अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. पीएमओकडून अण्णांच्या मागण्यांसंदर्भात पत्र देण्यात आले आहे. लोकपाल आयुक्तांची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून लोकायुक्ताच्या नव्या कायद्याची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. संयुक्त चिकित्सा समितीची अण्णांची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. या समितीवर अण्णांनी सूचवलेल्या लोकांना घेण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारीला लोकपालासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. तसंच लोकायुक्ताचा ड्राफ्ट तयार करुन येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशात लोकायुक्ताचा मुद्दा मांडू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

अण्णांची शेतकऱ्यांविषयीच्या मागण्या देखील मान्य करण्यात आल्या आहेत. शेतीमालाच्या हमी भावासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. नाशवंत शेतमालाच्या दरासंबंधी समिती नेमण्यात येणार आहे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अण्णा संपूर्ण राज्याची संपत्ती असून राळेगण सिध्दीच्या सर्व गावकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. अण्णांनी अतिशय शांततेत पाठिंबा दिला असल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. दरम्यान, ‘सर्व मागण्या मान्य केल्यामुळे मी उपोषण मागे घेत असल्याचे’ अण्णांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -