घरक्राइमपीएफआयच्या आणखी एका आरोपीला अटक

पीएफआयच्या आणखी एका आरोपीला अटक

Subscribe

नाशिक : देशभरात एटीएस, एनआयए या संस्थांच्या माध्यमातून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाई केली होती. छापेमारी मधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. देशभरात अनेक पीएफआय संघटनेचे सदसी असलेल्या संशयितांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातही अनेक संशयितांना अटक करण्यात आली, त्यातील ५ संशयितांना एटीएसने नाशिक जिल्हा न्यायलयात हजर केले होते. याच आरोपींचा साथीदार असलेल्या व आरोपींना तांत्रिक अर्थात टेक्नॉलॉजीच्या कामात मदत करत असल्याच्या आरोपाखाली त्याला शुक्रवारी (दी.२१) अटक करण्यात आली. त्याला नाशिक जिल्हा न्यायलयात हजर केल असतं त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उनेस उस्मान खैय्याब पटेल हा मुळचा जळगाव येथील रहिवासी आहे. मोबाईल, लॅपटॉप यातील सर्व डाटा नष्ट करणे, पुरावे नष्ट करणे आदि आरोपांच्या अंतर्गत शुक्रवारी (दी.२१) रात्री एटीएसने त्याला अटक केली. तांत्रिक कामात तरबेज असलेल्या उनेस याने आधीच अटकेत असलेल्या पाच आरोपींना तांत्रिक कामात मदत केलेली आहे. तसेच गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचे काम तो करत होता. दरम्यान, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायलयाने २६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -