घरमहाराष्ट्र'आपलं महानगर'चा दणका : अविनाश भोसलेच्या बडदास्तीची होणार चौकशी, मंत्री हसन मुश्रीफांनी दिले आदेश

‘आपलं महानगर’चा दणका : अविनाश भोसलेच्या बडदास्तीची होणार चौकशी, मंत्री हसन मुश्रीफांनी दिले आदेश

Subscribe

मुंबई : डीएचएफएल-येस बँक घोटाळ्यात मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध उद्योगपती आणि राजकीय वर्तुळात दबदबा असलेले अविनाश भोसले यांच्या जे. जे. रुग्णालयातील शाही बडदास्तीची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी आज (26 ऑक्टोबर) दिले. या चौकशीत जे. जे. रुग्णालयातील दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक  कारवाई करण्याची भूमिका विभागाने घेतली आहे. त्यानुसार चौकशी अहवाल आल्यानंतर तातडीने ही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Apalan Mahanagar Avinash Bhosales scandal investigation will be done in a big way Minister Hasan Mushrifani gave orders)

हेही वाचा – आरोपी अविनाश भोसलेंची ऑर्थररोड ऐवजी जेजे, सेंट जॉर्जमध्ये 10 महिने बडदास्त!

- Advertisement -

नाशिकचा ड्रग्जमाफिया ललित पाटीलच्या पुण्याच्या ससून रुग्णालयात मुक्कामाचे प्रकरण गाजत असताना “आपलं महानगर’ने आज अविनाश भोसले यांच्यासाठी जे. जे. रुग्णालयात राबत असलेल्या विशेष व्यवस्थेचे प्रकरण बाहेर काढले. या वृत्ताने वैद्यकीय शिक्षण विभाग आणि जे. जे. रुग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी या वृत्ताची दखल घेत त्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ यांनी ‘आपलं महानगर’चे वृत्त वाचून चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार अविनाश भोसले यांना रुग्णालयात कैद्यांसाठी असलेल्या वॉर्डात उपचारासाठी का दाखल केले नाही. जे. जे. रुग्णालयात व्हीआयपी व्यक्तींसाठी राखीव असलेल्या नर्सिंग होममध्ये भोसले यांची शाही बडदास्त ठेवण्याचा निर्णय कुणी घेतला आणि यात रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नेमका काय सहभाग होता, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

न्यायालयीन प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची प्रकृती बिघडल्यास किंवा त्याने प्रकृतीविषयी तक्रारी केल्यास त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते . अशा आरोपींना रुग्णालयात असलेल्या कैद्यांच्या कक्षेत राहून उपचार घ्यावे लागतात. मात्र भोसले यांची आर्थर रोड कारागृहाऐवजी जे. जे. रुग्णालयात 7 महिने आणि आता सेंट जॉर्ज रुग्णालयात 3 महिने असे मिळून 10 महिने राजेशाही बडदास्त ठेवली जात आहे. आरोपी असूनही अविनाश भोसले यांना जेजे रूग्णालयाच्या कैद्यांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये कधीच दाखल केलेले नाही. त्याऐवजी भोसलेंवर जेजे रुग्णालयाच्या  पहिल्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक 9 शेजारील वातानुकूलित विशेष वॉर्डात उपचार सुरू होते. त्यानंतर ऑगस्टपासून सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सिंग होमच्या सविशेष वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या अविनाश भोसलेंवरील उपचारांची जातीने काळजी घेत आहेत.

हेही वाचा – मिंधे-भाजपा सरकारच्या लाडक्या कंत्राटदारांसाठी… अंधेरीच्या पुलावरून आदित्य ठाकरेंची टीका

हे प्रकरण उघडकीस आल्याने रुग्ण कैद्यांच्या उपचारासाठी विशेष नियमावली तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ललित पाटीलचे पुण्याच्या ससून रुग्णालयातील प्रकरण समोर आल्यानंतर अशा रुग्ण कैद्यांच्या उपचाराची नियमावली तयार करण्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली होती. नियमावली तयार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आणि वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपले अहवाल विभागाला सादर केले आहेत. या अहवालाची छाननी करून रुग्ण कैद्यांसाठी लवकरच नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -