घरमहाराष्ट्रमिंधे-भाजपा सरकारच्या लाडक्या कंत्राटदारांसाठी... अंधेरीच्या पुलावरून आदित्य ठाकरेंची टीका

मिंधे-भाजपा सरकारच्या लाडक्या कंत्राटदारांसाठी… अंधेरीच्या पुलावरून आदित्य ठाकरेंची टीका

Subscribe

मुंबई : अंधेरी येथील गोखले पूल खुला करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2024चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यातही पुलाची एकच लाइन खुली होणार असून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी व नागरिकांसाठी रहदारीकरिता कधीपर्यंत सुरू होणार? त्यासाठी काही कारणास्तव पुन्हा पुन्हा मुहूर्त बदलणार का? असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. याच अनुषंगाने ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा – भाजपाच्या संस्कृतीने महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कारांचे वाभाडे, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

मुंबईत 3 जुलै 2018 रोजी अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळून दोन जणांचा बळी गेला होता. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले होते. त्यासाठी 18 नोव्हेंबर 2022 पासून गोखले पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. मे 2023 मध्ये या पुलाची एक लाइन सुरू करण्यात येणार होती. तर नोव्हेंबर 2023पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र काही कारणास्तव एक लाइन सुरू करण्याबाबत मे महिना 2023 व त्यानंतर जुलै 2023 आणि त्यानंतर दिवाळीचा मुहूर्त काढण्यात आला होता, मात्र काही ना काही कारणास्तव तीन वेळा ठरवलेले मुहूर्त हुकले.

यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुन्हा एकदा उशीर, हे नेहमीचे झाले आहे. डिलाईल रोड पूल असो की मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला अंधेरीचा गोखले पूल असो, बराच काळ ते बंदच आहेत. पूल कसा दुरुस्त करावा यासंदर्भात तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणे, संस्थांकडून आलेल्या अहवालातला फरक आणि नागरिकांना सहन करावा लागत असलेला त्रास यावर आम्ही वारंवार आवाज उठवला होता, तरी त्याकडे दुर्लक्षच केले गेले. त्यापाठी काही राजकीय स्टंटबाजी होती की वेगळा दबाव? असा खरमरीत प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड प्रकरण; प्रसिद्ध वकील लढणार मराठा आंदोलकांची केस

महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पूलांमध्ये दिरंगाई करणारे रेल्वे असल्याचे निदर्शनास आणून देतानाच, प्रत्येक कामासाठी हेच सुरू आहे, ‘तारिख पे तारिख’ आणि मिंधे-भाजपा सरकारच्या लाडक्या कंत्राटदारांसाठी ‘मलाई पे मलाई’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -