घरताज्या घडामोडीBJP : हिंमत असेल तर निवडणुकीत..., आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

BJP : हिंमत असेल तर निवडणुकीत…, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Subscribe

पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची आहेत. उबाठा सेनेला आव्हान आहे की, हिंमत असेल तर निवडणुकीत एकटे आमच्यासमोर या, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आव्हान दिले. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Ashish Shelar challenge to Uddhav Thackeray to come front of us alone in the election if we dare)

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

मुंबई भाजपा कोअर कमिटीची बैठक रंग शारदा येथे पार पडली. त्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी “पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची आहेत. उबाठा सेनेला आव्हान आहे की, हिंमत असेल तर निवडणुकीत एकटे आमच्यासमोर या. आपल्या स्वार्थासाठी वडिलांचे विचार, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडले, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अहमद पटेल ते शर्जील उस्मानी यांच्यासमोर मुजरा केला, त्यांना हिंदुत्ववादी मतदारांनी झिडकारलंय, हे सत्य चित्र आहे. स्वतःच्या पक्षासाठी गर्दी जमू शकत नाही म्हणून आता 22 पक्षांना एकत्र घेऊन शिवाजी पार्कवर गर्दी जमवावी लागते, अशी उद्धव ठाकरेंची आजची अवस्था आहे”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन

भारतीय जनता पक्षातर्फे 6 एप्रिल रोजी 400 कार्यक्रमाचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला “अब की बार चारसो पार” हा नारा बुलंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्या दिवशी राम मंदिराच्या निर्माणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची गुढी उभारून स्वागत करूया, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.

याशिवाय, “मुंबईतील महायुतीचे सहाही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याकरिता आवश्यक ते कार्यक्रम राबवण्यासंबंधी चर्चा बैठकीत झाली. महायुतीच्या प्रचारात आम्ही सर्वात पुढे राहू. गुढी पाढव्याला हिंदुत्वाची गुढी उभारून १ हजार ठिकाणी बैठका आणि जनसभांचे नियोजन केले आहे. CAA च्या समर्थनात भाजपा मैदानात उतरणार आहे. बरोबरीने 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता अशा आशयाचे 14 महत्त्वाचे मेळावे तसेच 140 वस्त्यांमध्ये संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. रामनवमीनिमित्त कल्पक कार्यक्रम तसेच मुंबईतील वस्त्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात येतील. महावीर जयंती आणि हनुमान जयंती या निमित्तानेही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत”, असेही आशिष शेलार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – UDDHAV THACKERAY : महाराष्ट्रात ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -