घरताज्या घडामोडीसत्ता गेल्यानं भाजप सैरभैर झालंय, सरकारला बदनाम करण्यासाठी आंदोलन - अस्लम शेख

सत्ता गेल्यानं भाजप सैरभैर झालंय, सरकारला बदनाम करण्यासाठी आंदोलन – अस्लम शेख

Subscribe

देशात जेव्हा जेव्हा निवडणूका जवळ येतात तेव्हा मोठ्या घटना का घडत आहेत?

राम मंदिराच्या घोटाळ्याबाबत भाजपनं स्पष्टीकरण द्यावे अशी शिवसेनेनं मागणी केली होती. परंतु भाजपनं या शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं या आंदोलनाला हिंसक वळण आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्यांना मारहणा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. सत्ता गेल्यानं भाजप सैरभैर झाली आहे. केवळ सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपनं आंदोलन केलं असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त घटनेची माहिती घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करतील असेही पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

राम मंदिरासाठीच्या जागेवरुन झालेल्या घोटाळ्याबाबत शिवसेनेनं जाब विचारलाय तर का एवढी मिर्ची झोंबली. सेनाभवनाच्या दिशेने जायचे आंदोलन करायचे आणि हातात दगडं घ्यायचे आणि कायदा हातात घ्यायचा हे योग्य नाही आहे. कायदा आणि सुव्यवस्था मुंबई पोलिस आयुक्तांना याबाबत माहिती देण्यात आली असून आयुक्त दादरमधील परिस्थितीचा आढावा घेतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे. देशात जेव्हा जेव्हा निवडणूका जवळ येतात तेव्हा मोठ्या घटना का घडत आहेत? असा सवाल अस्लम शेख यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेची निवडणूक घडली तेव्हा मोठी घटना घडली आहे. देशातील जवान शहीद झाले त्याबाबत अद्याप काही माहिती देण्यात आली नाही. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत आहे. त्यामुळे पुन्हा स्पर्धा करायची आहे. पाण्याविना मासा जसा फडफडतो तशी अवस्था भाजपची झाली आहे. भाजपची राज्यामध्येही सत्ता नाही आणि महानगरपालिकेतही सत्ता नाही आहे.

भाजपला सत्तेसाठी सैरभैर झाली आहे. त्यांना समजतच नाही आहे काय करायचं म्हणून काहीही आरोप करायचे आणि हंगामा करायचा त्यांना बोलायचेच होतं तर त्यांना मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले असते. असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काँग्रेसलाही वादात ओढलंय

भाजप ज्यांच्यासोबत २५ वर्ष होती त्यांच्याविरोधातच आता बंड पुकारलं आहे. शिवसेनेसोबतच्या वादात आता काँग्रेसलाही ओढण्यात आले आहे. काँग्रेसचा त्यात काही संबंध नाही. परंतु ह्यांचे जेवनच पचत नाही जोपर्यंत काँग्रेसच नाव घेत नाहीत. भाजपचं यामध्ये खरा चेहरा समोर येत आहे. शिवसेनेशी २५ वर्ष सोबत असताना सगळं बोरबर वाटत होत परंतु आता ते वाईट वाटत आहेत. पोलीस सर्व माहिती घेऊन चौकशी करतील आणि दोषींवर कारवाई करतील. कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -