घरक्राइमAugust Kranti Din : महात्मा गांधींचा पणतू मुंबई पोलिसांच्या ताब्यात, 'हे' आहे कारण

August Kranti Din : महात्मा गांधींचा पणतू मुंबई पोलिसांच्या ताब्यात, ‘हे’ आहे कारण

Subscribe

नवी दिल्ली | महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांना मुंबई पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तुषार गांधी हे आज सकाळी ‘भारत छोडो आंदोलन’ दिनाच्या स्मरणार्थ ऑगस्ट क्रांती मैदानावर जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यासंदर्भात तुषार गांधी स्वत: ट्विट करत माहिती दिली.

- Advertisement -

तुषार गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “आजऑगस्ट क्रांती दिनी मी ऑगस्ट क्रांती मैदानावर जाण्यासाठी निघालो असता पोलिसांनी मला पकडून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मला अभिमान आहे की, माझे आजोबा बापू आणि बा यांना देखील ब्रिटीश पोलिसांनी अटक केले होते. ऐतिहासिक तारीख.” मला पोलिसांनी सोडल्यानंतर लगेच ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाईन. ऑगस्ट क्रांती दिन आणि शहीदांचे नक्की स्मरण करेन, असे दोन ट्वीट तुषार गांधींनी केले.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण

‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वर्धापनदिनानिमित्त गिरगाव चौपाटीवरील टिळक पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मोर्चा काढला जाणार होता. यात तुषार गांधी आणि सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड या मोर्चात सहभागी होणार होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी तुषार गांधींना ताब्यात घेतले होते.

 

हेही वाचा – संभाजी भिडेंचं महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; पणतू तुषार गांधींना अश्रू अनावर!

काय आहे ‘मेरी माटी मेरा देश अभियान’?

‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाची आज ऑगस्ट क्रांतीदिनापासून मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर हा सोहळा साजरा झाला. स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून एक-एक कलश भरून माती गोळा केली जाणार आहे. ही माती दिल्लीतील अमृतवन येथे टाकून तिथे वृक्षारोपण केले जाणार आहे. यासाठी देशाच्या विविध भागांतून एक-एक कलश माती गोळा केली जात आहे. याची सुरुवात महाराष्ट्रात ऑगस्ट क्रांती दिनापासून मुंबईतून झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -