घरलाईफस्टाईलडार्क टुरिझम म्हणजे काय?

डार्क टुरिझम म्हणजे काय?

Subscribe

जगभरात प्रत्येकालाच फिरायला आवडते. मात्र काही टुरिस्ट असे असतात ज्यांना विचित्र ठिकाणी फिरायला जायला फार आवडते. तेथे धोका असला तरीही ते तेथे जाण्याचे धाडस करतात. असेच काहीसे डार्क टुरिझम आहे. आता देशात-विदेशात, सुंदर ठिकाणी फिरायला जायला सोडून लोक डार्क टुरिझमकडे वळू लागले आहेत. डार्क टुरिझमची ठिकाणं म्हणजे तेथे एखादी मोठी दुर्घटना घडली असेल, नरसंहार झाला असेल असे. येथे सामान्य माणसं जाऊ शकत नाहीत. यालाच डार्क टुरिझम असे म्हटले जाते.

- Advertisement -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डार्क टुरिझम सध्या बहुतांश जणांना आवडत चालले आहे. जी ठिकाणे खडकाळ झाली आहेत तेथेच लोक जात आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत जवळजवळ 80 टक्के लोकांना तरी अशा ठिकाणी जायचे आहे.

डार्क टुरिझम मध्ये लोकांना अशी ठिकाणे पहायची असतात जी रहस्यात्मक असतात. हिरोशिमा आणि नागासाकी असो किंवा अफगाणिस्तानातील मोठी दुर्घटना घडलेले ठिकाण. तेथे लोक आवर्जुन जाऊ पाहतात. डार्क टुरिझम मध्ये काही चुकीचे नाही. पण काही वेळेस डार्क टुरिझमच्या नादात एखाद्या समस्येचा सुद्धा सामना करावा लागू शकतो.

- Advertisement -

जगातील प्रसिद्ध डार्क टुरिझम बद्दल बोलायचे झाल्यास तर न्युयॉर्क मधील ग्राउंड जीरो, युक्रेन मधील चेरनोबिल, रवांडा मधील मुरांबी नरसंहार स्मारक, लिथुआनिया मधील केजीबी मुख्याल, पोलंड मधील ऑशविट्स एकाग्रता शिबिर, जापान मधील हिरोशिमा, कंबोडियातील तुओल स्लेंग नरसंहार संग्रहालय प्रसिद्ध आहे.


हेही वाचा- हाइकिंगवेळी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -