घरताज्या घडामोडीआयुर्वेदामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास होते मदत - अमित देशमुख

आयुर्वेदामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास होते मदत – अमित देशमुख

Subscribe

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता आपल्यामधील प्रतिकारक शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्यासाठी आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक संकल्पना समोर आली आहे. होमिओपॅथी आयुर्वेद युनानी यामुळे आपली प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, हे दिसून येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांच्या हस्ते आयुष इम्युनिटी क्लिनिक होमिओपॅथी आयुर्वेद युनानी ऑनलाईन उद्घाटन सोहळा आज सकाळी पार पडला. यावेळी आयुष टास्क फोर्स, कोविड-१९ चे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, डॉ. मनोज राका, डॉ. अमित दवे, डॉ. कुलदीप कोहली, डॉ. शुभा राऊळ, डॉ. राजश्री कटके, डॉ. संजय लोंढे, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. जुबेर शेख आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी अमित देशमुख म्हणाले की, ‘इम्युनिटी क्लिनिक प्रकल्पाला महाराष्ट्र कोविड-१९ आयुष टास्क फोर्सकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यात सुमारे ६५० क्लिनिक सुरू करण्यात आली असून ५०० हून अधिक क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. कोविड- १९ या आजारावर अजूनही औषधे किंवा लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास आजार न होणे किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. याच धर्तीवर प्रतिकारक शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्यासाठी ही आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकची संकल्पना समोर आली आहे.


हेही वाचा – कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकतात ‘हे’ दोन स्टिरॉइड – WHO

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -