घरताज्या घडामोडीघराचे स्वप्न आणखी स्वस्त !

घराचे स्वप्न आणखी स्वस्त !

Subscribe

नरेडकोकडून घर खरेदी करणार्‍यांना मुद्रांक शुल्क माफ

राज्य सरकारने मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) कमी करण्याचा निर्णय घेत घर खरेदी करणार्‍यांना मोठा दिलासा दिला. शासनाने 31 डिसेंबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात 5 टक्क्यांहून 2 टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्क कमी करण्यात आले आहे. त्यानूसार 1 सप्टेंबर पासून ते दि.31 डिसेंबर 2020 या कालावधीकरिता 3 टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र याहीपुढे जात नाशिककरांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरीता बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या नरेडको (नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काँन्सिल) या संघटनेने घर खरेदी करणार्‍यां नागरिकांकडून उर्वरित 3टक्के स्टॅम्प डयुटीही न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्टॅम्प डयुटी नरेडको आपल्याकडून देणार आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना ही सुुट देण्यात येणार असल्याचे नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी बोलतांना अध्यक्ष अभय तातेड म्हणाले, कोविड19 च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. परिणामी राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे तिला चालना देण्यासाठी राज्य सरकारने
मुद्रांक शुल्क कमी करण्यासाठी संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शासनाने ही मागणी मान्य करत अखेर मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेडकोने याही पुढचे पाउल टाकत नाशिककरांना दिलासा देत स्वतःचे घर खरेदी करू इच्छिणार्‍यांकडून उर्वरित 3 टक्के स्टॅम्प डयुटी न आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे गृह कर्जासाठी बँकांनीही प्रोसेसिंग फी आकारू नये किंवा ती अल्प आकारावी याबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

सध्या बँकांनीही गृह कर्जाच्या दरात कपात केली आहे. तसेच प्रथमच घर खरेदी करणार्‍यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) २ लाख ६७ हजारांचा लाभ मिळतो. आता राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात ३ टक्के कपात केली आहे तर नरेडकोने घर खरेदी करणार्‍या नागरिकांकडून शून्य टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने घर खरेदीसाठी हा सुवर्णकाळ असल्याचे मत यावेळी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये संघटनेचे ७० टक्के सभासद आहेत. संघटनेचे सभासद असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडे घर खरेदी केल्यास ग्राहकांना याचा लाभ दिला जाईल. तसेच नाशिकसह पुणे, मुंबई, ठाणे या शहरांमध्येही नरेडकोच्या सभासदांकडून ग्राहकांना याचा लाभ दिला जाईल असे जयेश ठक्कर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेप्रसंगी नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड, सूनिल गवादे, राजन दर्यानी, अविनाश शिरोडे, जयेश ठक्कर आदि उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -