घरताज्या घडामोडीBacchu Kadu : बच्चू कडूंना धक्का, प्रहारच्या नेत्याचा वंचितमध्ये प्रवेश

Bacchu Kadu : बच्चू कडूंना धक्का, प्रहारच्या नेत्याचा वंचितमध्ये प्रवेश

Subscribe

माजी पालकमंत्री बच्चू कडू यांना अकोल्यात मोठा धक्का बसला आहे. अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पहिल्या जिल्हा परिषद सभापती ठरलेल्या स्मृती गावंडे यांचे पती निखील गावंडे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट तालुका प्रमुख तुषार पाचकोर तसेच संजय बुध यांनी सहकाऱ्यांसह १५ जून रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. वंचितच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा जाहीर प्रवेश झाला आहे.

- Advertisement -

पक्ष प्रवेश करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा ओबीसी नेते ॲड. संतोष रहाटे, बंटी पाटील गावंडे, हिरा सरकटे आणि सचिन सरकटे आदी. मान्यंवर उपस्थित होते.

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे अकोला जिल्‍ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत. त्याच मतदारसंघात प्रहारमध्ये फुट पडल्याने पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोण अनिल बोंडे? एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरून शिवसेनेच्या नेत्याचा संतप्त सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -