घरमहाराष्ट्रमराठा आंदोलनावरुन बच्चू कडूंचा सरकारला इशारा; 'आता अंत पाहू नका...'

मराठा आंदोलनावरुन बच्चू कडूंचा सरकारला इशारा; ‘आता अंत पाहू नका…’

Subscribe

आधी महाविकास आघाडी सरकारला मित्रपक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारने साथ दिली होती. त्याच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू हे राज्यमंत्रीसुद्धा होते.

मुंबई : आज या लोकांनी जी ज्योत पेटवली आहे त्याचा सन्मान करणं हे महत्त्वाचे आहे. वेळ पडली तर मी देखील उपाशी राहण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सरकारने अंत पाहू नये. नाहीतर पुन्हा एकदा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे सरकाने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नका असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(Bachu Kadu’s warning to the government from the Maratha movement; ‘Don’t see the end now…’)

आधी महाविकास आघाडी सरकारला मित्रपक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारने साथ दिली होती. त्याच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू हे राज्यमंत्रीसुद्धा होते. मात्र, या मिळालेल्या मंत्रीपदाला लाथ मारत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी होत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडले होते. या बंडानंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार राज्यात सत्तेत जरी आले असले तरी बच्चू कडू यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. तेव्हा या ना त्या कारणाने कडू सरकारवर आपला संताप व्यक्त करीत असतात. दरम्यान आता जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी वक्तव्य करीत सरकारला अल्टीमेटमच देऊ केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “जालन्यातील लाठीचार्जमध्ये फडणवीसांचा हात नाही, तर…”, रामदास आठवलेंचे मोठे विधान

तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच

29 ऑगस्टपासून सुरू असलेल्या जरांगे यांच्या उपोषणावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. काल राज्य मंत्री मंडळाच्या उपसमिती बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सरकारने माफी मागितली खरी पण अद्याप तोडगा निघालेला नाही. आंदोलन सुरूच आहे. अशातच आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातील घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले असून, थेट सरकारवरच निशाणा साधला आहे. तर अभ्यास करुन सरकारने धनगर मुस्लिम आणि मातंग समाजाला देखील आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायला हवा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : हरीश साळवेंच्या लग्नाच्या पार्टीत ललित मोदी कसा? संजय राऊतांनी उपस्थित केला प्रश्न

जरांगेच्या उपोषणाला कडूंचा पाठींबा

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपला पाठींबा असून, काल फडणवीसांनी मागितलेल्या माफीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जर माफी मागून राज्य शांत राहत असेल तर फार चांगले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज कसा केला? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -