घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरBaraskar Vs Jarange : जरांगे उपोषणादरम्यान दूध भाकरी खात होते; बारसकरांचा गंभीर...

Baraskar Vs Jarange : जरांगे उपोषणादरम्यान दूध भाकरी खात होते; बारसकरांचा गंभीर आरोप

Subscribe

राज्य सरकारने 20 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण जाहीर केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यांना जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तरही दिले. आज पुन्हा अजय महाराज बारसकरांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकार यांनी आज 24 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहे. मनोज जरांगे हे उपोषणादरम्यान दूध भाकर खात होते, महिलांकडून पाय चेपून घेत होते. असाही गौप्यस्फोट बारसकर यांनी केला. (Baraskar Vs Jarange Jarange was eating milk bread during the fast Baraskars serious accusation)

राज्य सरकारने 20 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण जाहीर केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यांना जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तरही दिले. आज पुन्हा अजय महाराज बारसकरांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना बारस्कर म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावर बलात्काराचा आणि विनयभंगाचा आरोप केला. तर मग त्या पीडित महिला त्यांनी समोर आणाव्यात. त्याचबरोबर मी प्रश्न आरक्षणाबाबत विचारले पण जरागेंनी त्याची उत्तर दिली नाहीत.

- Advertisement -

मागच्या 17 दिवसांचं आंदोलन सुरु होतं तेव्हा जरांगे कोणाच्या घरात बसून दूध भाकरी खात होते? कोणाकडून पाय चेपून घेतले याचं माझ्याकडं रेकॉर्ड आहे असाही गौप्यस्फोट अजय महाराज बारसकर म्हणाले. त्याचबरोबर कोणत्या महिलेला अंबडचा आमदार बनवण्याचं आश्वासन दिलं, हे मला माहिती आहे. पण आमची संस्कृती ती नाही. रातोरात जरांगेंकडे मोठा पैसा आला याविरोधात मी इन्कम टॅक्स आणि ईडीकडं जाणार आहे, असंही बारस्कर यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Baraskar Vs Jarange : बारसकरविरुद्ध जरांगे संघर्षाचा दुसरा अंक; पुन्हा झडताहेत आरोपांच्या फैरी

- Advertisement -

पुढे बोलताना अजय महाराज बारसकर म्हणाले की, माझ्यावर जे आरोप झाले त्यावर चौकशीसाठी मी तयार आहे. नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टसाठी देखील मी तयार आहे, असेही बारस्कर यावेळी म्हणाले. आजच्या पत्रकार परिषदेबरोबर रविवारी सकाळी 11 वाजता दुसरे लोक पत्रकार परिषद घेऊन जरांगेंबद्दल माहिती देतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा : Amol Mitkari : अट एकच…आवाज तुतारीतूनच यायला हवा; आव्हान तर दिलं, पण चेक लिहिताना मिटकरी गंडले

जरांगेवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

यावेळी बोलताना अजय महाराज बारसकार म्हणाले की, मनोज जरांगे यांच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर काल माझ्यावर मुंबईत हल्ला झाला त्याला मनोज जरांगे पाटीलच जबाबदार असल्याचाही आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला. यावेळी देहू संस्थानलाही अजय महाराज बारसकरांनी आव्हान दिलं. जर तुम्हाला मान्य असेल तर जरांगे म्हणतील त्या प्रकारे अंभागात बदल करावा, परंतु गाथ्यामधील अभंगात बदल करता येत नाही असेही अजय महाराज बारसकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -