घरमहाराष्ट्रपाळणा घरात चिमुकल्यांना ठेवत आहात...सावधान!

पाळणा घरात चिमुकल्यांना ठेवत आहात…सावधान!

Subscribe

पुण्यात एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांना ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुणावण्यात आली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात आई-वडिल नोकरी करण्यासाठी दिवसभर घराच्या बाहेर असतात. त्यामुळे त्यांना आपल्या चिमुकल्यांना पाळणा घरात ठेवावे लागते. मात्र आपण आपल्या मुलांना ज्यांच्यावर विश्वास ठेवून पाळणा घरात ठेवतो. ती आपली मुलं खरचं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडतो. अनेक ठिकाणाच्या घटना ऐकून चिमुकले सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. आपल्या चिमुकल्यांना पाळणा घरात ठेवत असाल तर सावधान! कारण पुन्हा एकदा पाळणा घरात ठेवल्या जाणाऱ्या चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याची पुनरावृत्ती पुण्यात झाल्याची पाहायला मिळाली.

पुण्यात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

पुण्यातील कोथरुड परिसरातील एका पाळणा घरात ठेवलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार के्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळणाघर चालवणाऱ्या मालकीनींच्या मुलांनी आणि त्याच्या मित्रांने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपींना ४ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

आई – वडिल दोघ ही नोकरी करणारे असल्याने मुलीला कुठे ठेवणार असा प्रश्न पालकांना पडला. त्यांनी जवळच्या कोथरुड परिसरातील एका पाळणा घरात आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला ठेवले. मात्र ती चिमुरडी सुरक्षित नसल्याचे समोर आले. पाळणा घरातील मालकींनीचा १७ वर्षाचा मुलगा आणि त्याचा मित्र गेल्या काही दिवसांपासून या मुलीवर अत्याचार करत होते. अचानक ही चिमुकली घरी गेल्यानंतर कपडे काढून झोपत होती. हा विचित्र प्रकार तिच्या आई – वडिलांच्या लक्षात आला. याबाबत चिमुकलीकडे चौकशी केल्यास पाळणाघरातील दादानेच असे करायला सांगितले असल्याचे ती मुलगी बोली. त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. चिमुकलीच्या आई – वडिलांनी तात्काळ धाव घेत कोथरुड पोलिसात तक्रार करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या दोघांना ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -