घरमहाराष्ट्रभारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकाकडून भाई जगतापांना धक्काबुक्की

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकाकडून भाई जगतापांना धक्काबुक्की

Subscribe

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांचे सुरक्षा रक्षक काटेकोरपणे त्यांची सुरक्षा करीत आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) कन्याकुमारी येथून सुरु झाली. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. हातात मशाल घेऊन राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेड (nanded) मधील शंकरनगर (shankarnagar) येथून ही यात्रा पुढे रवाना झाली. भारत जोडो यात्रा सुरु असतानाच काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना धक्काबुक्की झाली. ही धक्काबुक्की कॅमेरात देखील कैद झाली.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्याच सुरक्षा रक्षकाकडून काँग्रेस आमदार भाई जगताप (MLA bhai jgtap) यांना मागे ढकलण्यात आले. त्यामुळे भाई जगतापांचा तोल गेल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांचे सुरक्षा रक्षक काटेकोरपणे त्यांची सुरक्षा करीत आहेत.

- Advertisement -

congress rahul gandhi bharat jodo yatra nanded read details about Yatra

अशातच भारत जोडो यात्रेसाठी निघालेले राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी आता महाराष्ट्र पोलीस सुद्धा तैनात झाले आहेत. पुढील काही दिवस भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असणार आहे. राज्यात ही यात्रा तब्बल 344 किलो मीटरचा प्रवास करणार आहे. ही पदयात्रा महाराष्ट्रातील नांदेड, वाशिम, अकोला, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमधून जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रातील एकूण 14 ठिकाणी थांबणार आहेत. ही यात्रा 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघात भेट देणार आहे.

- Advertisement -

दरम्यान 2024 च्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधीसुद्धा भारत जोडो यात्रेच्या निमित्त देशभरात भेट देणार आहेत. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राहुल गांधी 2024 च्या निवडणुकांसाठी पक्षबांधणी करत आहेत.

माजी मंत्र्यांनाही या आधी झाली होती गंभीर दुखापत

याधीही भारत जोडो यात्रेत माजी मंत्र्यांना गंभीर दुखापत झाली होती. राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधींच्या सोबतच नितीन राऊत (nitin raut) यात्रेत चालत होते. भारत जोडो यात्रेला (bharat jodo yatra) मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सुद्धा प्रयत्न करत होते. राहुल गांधी यांच्या पासून पोलीस, लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान या सगळ्या गदारोळात तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले. नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत (nitin raut) यांना ढकलले तेव्हा तोल जाऊन ते जमिनीवर पडले. यावेळी त्यांचं डोकंसुद्धा जमिनीवर आपटेल म्हणून बचाव कारण्यासाठी नितीन राऊत यांनी त्यांचा हात स्वतःच्या डोक्याखाली धरला. पण तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यालासुद्धा इजा झाली. नितीन राऊत यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. तर भुवईच्या वरचा भाग कापला गेला आहे. मार लागल्याने त्यांच्या डोळा सुद्धा काळानिळा पडला आहे. यानंतर नितीन राऊत यांना उपचारांसाठी हैदराबादच्या बासेरी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.


nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -