घरताज्या घडामोडीसंजय राऊतांविरोधात दबावतंत्र वापरले पण त्यांनी गद्दारी केली नाही; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

संजय राऊतांविरोधात दबावतंत्र वापरले पण त्यांनी गद्दारी केली नाही; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर 100 दिवसांनी जामीन मिळाला. संजय राऊत यांच्या जामीनानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर 100 दिवसांनी जामीन मिळाला. संजय राऊत यांच्या जामीनानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केले. ‘संजय राऊत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत, उगचचे बाळासाहेंबांचे शिवसैनिक म्हणून मुखवटे लावून फिरत नाहीत’, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. (Aaditya Thackeray Talk On Thackeray Group MP Sanjay Raut Bail)

“संजय राऊत यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. कारण संजय राऊत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत, उगचचे बाळासाहेंबांचे शिवसैनिक म्हणून मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्याविरोधातही दबावतंत्र वापरले, पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाही, ते डरपोक नाही. जे डरपोक आहेत ते पळून गेले”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

“संजय राऊत यांना मिळालेल्या जामीनाबाबत मी स्वागत करतो. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललोय का, हा आपण सर्वांनी विचारण करणे गरजेचे आहे. तुम्ही पाहिलात तर, या राज्या सरकारविरोधात जो कोणी बोलेल त्याला धमकी दिली जाते. पहिली धमकी दिली जाते चौकशी लावू, दुसरी धमकी तुरुंगात टाकू दिली जाते. जे कोणी राजकीय नेते सत्य बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठच्या तरी विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा एखादा विषय लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे”, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

“एकंदरीत सरकार विरोधात बोलले की, कारवाई होते आणि यंत्रणा वापरली जाते. हे आज राजकीय लोकांवर होतेय. हे वातावरण आपल्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी चांगले नाही”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.


हेही वाचा – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा बारामती दौऱ्यावर; भाजपाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -