घरताज्या घडामोडीतौत्के चक्रीवादळ, युपीएससी परीक्षा मुद्द्यांवर भाई जगताप यांचे पडळकरांसोबत ट्विटर वॉर

तौत्के चक्रीवादळ, युपीएससी परीक्षा मुद्द्यांवर भाई जगताप यांचे पडळकरांसोबत ट्विटर वॉर

Subscribe

नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. परंतु केंद्राने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यावरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच पडळकरांनी भाई जगताप यांच्या ट्विटला उत्तर देताना मुंबईतील चक्रीवादळाच्या परीस्थितीवरुन निशाणा साधला आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा आणि चक्रीवादळ तडाख्यावरुन पडळकर आणि भाई जगताप यांच्यात ट्विटर वॉर झाला आहे.

भाई जगताप यांचा पडळकरांवर निशाणा

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी ट्विट करुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. राज्य सरकारने एमपीएससी ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे. केंद्र सरकारने यीपीएससीची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का? महाराष्ट्र द्रोहा कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का? असा सवाल भाई जगताप यांनी केला आहे. तर #महाराष्ट्रद्रोही असा हॅशटॅग वापरला आहे.

- Advertisement -

गोपीचंद पडळकर यांचे प्रत्युत्तर

भाई जगताप यांनी केलेल्या ट्विटवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही… काल चक्री वादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता? असा पलटवार केला पडळकर यांनी केला आहे. त्यासोबत #वसूली_सरकार असा हॅशटॅग पडळकरांनी वापरला आहे.

- Advertisement -

खाद्य तेलाच्या किमतीवरुन निशाणा

काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी खाद्यतेलाच्या किमतीवरुन पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. रासायनिक खते आणि खाद्य तेलाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काँग्रेस – ७० वर्षे खाद्यतेल ₹९०, भाजपा – ७ वर्षे खाद्यतेल ₹१७०, ७ वर्षात जवळ जवळ दुप्पट, आहे ना विकास?? मोदी है तो मुमकीन है अशा आशयाचे ट्विट भाई जगताप यांनी केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -