Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज्यांसाठी कोवॅक्सिन लस २०० रुपयांनी स्वस्त, सीरमनंतर भारत बायोटेककडून लसीचे दर कपात

राज्यांसाठी कोवॅक्सिन लस २०० रुपयांनी स्वस्त, सीरमनंतर भारत बायोटेककडून लसीचे दर कपात

भारत बायोटेकची ६०० रुपये प्रति डोस लस आता ४०० रुपये प्रति डोस किंमतीने राज्य सरकारला मिळणार

Related Story

- Advertisement -

येत्या १ मेपासू कोरोना १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारत बायोटेककडून कोवॅक्सिनच्या लसीची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता सर्व राज्यांना दिलासा मिळाला आहे. भारत बायोटेक स्वदेशी कंपनी आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या दरात कपात केल्यानंतर आता भारत बायोटेककडून लस दर कपात केली असल्याची घोषणा केली आहे. राज्यांना पहिले ६०० रुपये कोरोना लस प्रति डोस किंमत ठरवण्यात आली होती मात्र आता सर्व राज्यांना ४०० रुपये प्रति डोस मिळणार आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रामाणात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु असून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. १८ ते ४५ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्राने राज्यांवर टाकली आहे तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्राच्या या धोरणानंतर भारत बायोटेक आणि सीरम या लस उत्पादित कंपन्यांनी लसीचे प्रति डोस किंमत जाहीर करण्यात आली होती. लसीचे दर राज्यांना एक आणि केंद्र सरकारला एक असल्यामुळे प्रमुख नेत्यानी केंद्रावर टीका केली होती.

- Advertisement -

देशातून लसींच्या दरावर टीका आरोप करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधून दर कपात करण्यासंदर्भात आदेश दिले होते. यानुसार आता भारत बायोटेकची ६०० रुपये प्रति डोस आता ४०० रुपये प्रति डोस किंमतीने राज्य सरकारला मिळणार आहे. राज्य सरकारला दिलासा मिळाला असला तरी खासगी रुग्णालयांना लसीचे डोस हे १२०० रुपये प्रति डोसनेच मिळणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. भारत बायोटेककडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून या पत्रकात म्हटले आहे की, देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. यामुळे येणारे आव्हाने लक्षात घेऊन कोवॅक्सिन लसीचे दर राज्य सरकारसाठी कमी करण्यात येत आहेत.

- Advertisement -