Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Corona Vaccination: NESCO केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची भली मोठी रांग !

Corona Vaccination: NESCO केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची भली मोठी रांग !

सरकार सोशल डिस्टन्सिंग पाळा असं बोलत असतांना दुसरीकडे मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तु खरेदी विक्री साठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून भारतात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून आता 18 वर्षापुढील लोकांचे सुद्धा लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच नव्या नियमांनुसार राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालय सुद्धा लस उत्पादकांकडून लस विकत घेऊ शकतील असे घोषित करण्यात आले आहे. पण गोरेगाव मधील NESCO कोव्हिड सेंटर मध्ये नागरिकांनी लसीकरणासाठी भली मोठी रांग लावलेली दिसत आहे. एकीकडे सरकार सोशल डिस्टन्सिंग पाळा असं बोलत असतांना दुसरीकडे मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

- Advertisement -