घरमहाराष्ट्ररावण दहनास भीम आर्मीचा विरोध

रावण दहनास भीम आर्मीचा विरोध

Subscribe

रावण दहनास भीम आर्मी या सामाजिक संघटनेने प्रखर विरोध केला आहे. ठाणे, नाशिक आणि आता त्यापठोपाठ पुण्यात देखील रावण दहनास भीम आर्मीने विरोध केला असून पुण्यात रावण दहन केल्यास त्यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली जात आहे.

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी होत असलेल्या रावण दहनास भीम आर्मी या सामाजिक संघटनेने प्रखर विरोध केला आहे. श्रीलंकेसह दक्षिण भारतात पूजा होत असलेल्या महात्मा आणि आदर्श राजा रावणाचे महाराष्ट्रासह काही राज्यात दहन केले जाते. मात्र आता रावण दहनास भीम आर्मीचा विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये रावण दहनास आदिवासी बचाव अभियान आणि कोकण आदिवासी सेवा संघाने विरोध दर्शवला आहे. आता या पठोपाठ पुण्यातही रावण दहनासनिरोध सुरु झाला आहे. तसेच पुण्यात रावण दहन केल्यास त्यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली जात आहे. आता पुण्यापाठोपाठ ठाण्यात देखील याला विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही प्रथा त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

का केला जात आहे विरोध

आदिवासी आणि मागासवर्गीय समाजातील अनेकांसाठी रावण हे दैवत मानले जाते. त्यामुले रावण दहन केल्यामुळे समाजाच्या भावना देखील दुखावल्या जाऊ शकतात. अशा कार्यक्रमांना परवानगीच देऊ नये, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. त्यासोबत राजाच्या अन्य भागांमध्येही वेगवेगळ्या संघटनांनी या संदर्भातील पत्र दिल्याने रावण दहनावरुन महाराष्ट्रात वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

- Advertisement -

पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

भीम आर्मीने पुणे पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिले आहे. त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. जर पोलिसांनी देखील या कार्यक्रमास परवानगी दिली तर संघटनेचे कार्यकर्ते रस्तायवर उतरुन तीव्र आंदोलन करतील. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी पोलीस जबाबदार असतील असा इशारा देखील देण्यात आला आहे.

हे आहे संघटनांचे म्हणणे

बऱ्याच आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमधील आदिवासी समाजात रावणाला दैवत मानले जाते. तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये रावणाची मंदिरे आहेत. मात्र इतिहासात रावणाची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

लंकाधिपती रावण हा प्रकांडपंडित, दानशूर पराक्रमी आणि तत्त्वशील राजा होता . मात्र आपली बहीण शूर्पणखेला विद्रुप केलेल्या लक्ष्मणाला धडा शिकविण्यासाठी रावणाने सीतेला पळवून नेले असले तरी तिचा अवमान किंवा शीलभंग कधीच केला नाही अशी आख्यायिका आहे. मात्र तरीही सीतेला पळवून नेले आणि म्हणून रामाने त्याची हत्या केली. रावणाला दहा तोंडे होती तो असुर म्हणजे राक्षस होता अशी प्रतिमा रंगवून रावणाला खलनायक ठरवत त्याचे दहन केले जात आहे.  – भिमपँथर गवळी, भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख

वाचा – भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचा रावन दहनाला विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -