घरताज्या घडामोडीKarni Sena Vs Bhim shakti : करणी सेना अध्यक्षाला भीम सैनिकांनी दिला...

Karni Sena Vs Bhim shakti : करणी सेना अध्यक्षाला भीम सैनिकांनी दिला चोप, पनवेल पालिकेतील घटना

Subscribe

पनवेल – करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांना भीम सैनिकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पनवेलच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ घडली. अजय सिंग सेंगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल त्यांना भीम सैनिकांनी चोप दिल्याचं सांगितलं जात आहे.

अजय सेंगर यांनी पुन्हा तसं काही वक्तव्य केलं तर पुन्हा चोप दिला जाईल, असा इशारा भीमसैनिक सुभाष गायकवाड आणि सागर पगारे यांनी दिला आहे.

- Advertisement -

देशाचे संविधान बदलण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य करणी सेनेचे अध्यक्ष सेंगर यांनी केलं होतं. परंतु काही कामाकरिता सेंगर हे पालिका कार्यालयात आले. मात्र, पालिका कार्यालयाबाहेर सेंगर आले असता त्यांना भीमसैनिकांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांनी सेंगर यांना मारहाण करताना शिवीगाळ देखील केली.

अजय सिंग सेंगर यांनी दोनवेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. आपल्याला संविधानाची गरज नाही. संविधान बदला, असं ते लोकांना सांगतात. आम्ही सर्वांनी या विरोधात पोलीस ठाण्यात मोर्चा नेला होता. पण त्यांनी दोन वेळा जामीन घेतल्यामुळे ते बाहेर आले, अशी प्रतिक्रिया सुभाष गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

सेंगर हे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी या पूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. एका वादग्रस्त वक्तव्यावरून सेंगर यांना अटक देखील करण्यात आली होती.


हेही वाचा : IAS अधिकारी सुनील केंद्रेकर घेणार स्वेच्छानिवृत्ती; शासनाकडून अर्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -