घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआंबेडकरी चळवळ मुस्लिमांच्या पाठीशी, मात्र औरंगजेबाचे समर्थन अजिबात नाही; प्रकाश आंबेडकरांनी 'तिथे'...

आंबेडकरी चळवळ मुस्लिमांच्या पाठीशी, मात्र औरंगजेबाचे समर्थन अजिबात नाही; प्रकाश आंबेडकरांनी ‘तिथे’ जाणे अयोग्य

Subscribe

नाशिक : महाराष्ट्रात मागील काही महिन्यात औरंगजेब या विषयावरून राजकारण ढवळून निघत आहे. औरंगजेबाचे पोस्टर नाचवणे आणि स्टेटस ठेवणे या कारणाने राज्यातील अनेक शहरात सामाजिक सलोखा बिघडण्याच्या घटना झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट औरंजजेबाच्या थडग्यावर जात चादर आणि फूल वाहिली होती. यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले होते. नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांची कृती अयोग्य असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे.

आठवले यावेळी म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी औरगजेबाच्या थडग्यावर जाणे अत्यंत चुकीचे आहे. आंबेडकरी चळवळ ही मुस्लिमांना नक्कीच पाठिंबा देणारी आहे. मात्र, औरंगजेबाचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. औरंगजेबाच्या नावाने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असतील. त्यावरून जर हिंदू – मुस्लिम समाजात तेढ निर्माण होणार असेल तर औरगजेब हा विषय टाळणे आवश्यक आहे.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आणि त्यांनी मुस्लिम समाजाची सहानभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीने कृत्य करणे अत्यंत चुकीचे आहे. सामाजिक दृष्टिकोनातूनही बघता ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या या अशा पद्धतीला आमचा विरोध असल्याचे म्हणत औरंगजेब या विषयावरून आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना जोरदार टोला लगावला आहे.

मुस्लिम समाजाला आवाहन 

यावेळी बोलताना केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आमच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार आपल्यासाठी काम करत आहे. ज्या – ज्या योजना राबवल्या त्याचा फायदा मुस्लिम समाजालाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे आम्ही मुस्लिमांच्या विरोधात अजिबात नाही. त्यामुळे औरंगजेबाला मध्ये आणून हिंदू – मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल असेल करू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -