घरमहाराष्ट्र'हा' फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीत रवाना; पोलिसांचा फौजफाटा तैनात

‘हा’ फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीत रवाना; पोलिसांचा फौजफाटा तैनात

Subscribe

ड्रेसकोडवरुन वातावरण तापलं

शिर्डीतील साईबाबा संस्थानाच्या ड्रेसकोडसंदर्भातील भक्तांना आवाहन करणारे फलक लावण्यात आले. यानंतर या लावण्यात आलेल्या फलकावरून वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, शिर्डी देवस्थानाकडून लावण्यात आलेल्या फलकाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संस्थानने त्वरित हे फलक काढण्याची मागणी केली असून तो नाही काढला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, तृप्ती देसाई पुणे येथून शिर्डीसाठी रवाना झाल्या आहेत. यामुळे तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

“शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारणार,” असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले असून सीमेवरच त्यांना रोखू असा इशारा त्यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर आज सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डी संस्थाननं केलेल्या ड्रेस कोडविरोधात आज तृप्ती देसाई थेट शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. अहमदनगर पोलीस त्यांना सीमेवरच रोखण्याची शक्यता आहे.

साई संस्थानकडून भक्तांना आवाहन

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असे आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आले आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावे, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावे,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.


प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -