घरमहाराष्ट्रशेतकरी आंदोलन: दानवेंनी पुरावे द्यावेत आणि केंद्रानं सर्जिकल स्ट्राईक करावा - राऊत

शेतकरी आंदोलन: दानवेंनी पुरावे द्यावेत आणि केंद्रानं सर्जिकल स्ट्राईक करावा – राऊत

Subscribe

शेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंवर संजय राऊत संतापले

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. चीन आणि पाकिस्तानशी आंदोलनाचा संबंध जोडणाऱ्यांनी एकदा विचार करावा आणि दानवेंचे विधान निषेधार्ह असल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवाय, दानवेंनी पुरावे द्यावेत आणि केंद्राने चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, असे आवाहनही केले आहे.

रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, “केद्राचा एक मंत्री शेतकऱ्यांच्या आदोलनामागे पाकिस्तान, चीनचा हात असल्याची माहिती देत असेल, तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तात्काळ पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राईक करायला हवे. जर आमच्या देशात बाहेरची शक्ती, परदेशी हात अशांतता निर्माण करत असेल आणि केंद्रीय मंत्री असे विधान करत असतील तर मी, शिवसेना हे विधान गंभिरतेने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान आणि तीन्ही संरक्षणदलाचे प्रमुख यांनी तात्काळ यावर गंभीररित्या विचार करायला हवा आणि चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करायला हवे,” असे संजय राऊत म्हणाले. रावसाहेब दानवे यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी अत्यंत मोठा मुद्दा देशासमोर आणला, असे देखील राऊत म्हणाले.

- Advertisement -

दानवेंनी काय म्हटलं होतं?

रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना “हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवले आणि सांगितले सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावे लागेल. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.


हेही वाचा – दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल; बच्चू कडू संतापले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -