घरमहाराष्ट्रअधिकाऱ्यांच्या बदल्यांध्ये मोठा भ्रष्टाचार, राष्ट्रवादीपाठोपाठ ठाकरे गटाचाही आरोप

अधिकाऱ्यांच्या बदल्यांध्ये मोठा भ्रष्टाचार, राष्ट्रवादीपाठोपाठ ठाकरे गटाचाही आरोप

Subscribe

गेल्या काही दिवसांत राज्यात विविध विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर आता त्यांच्यानंतर हा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडूनही करण्यात आलेला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांत विविध विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गृह खात्यात देखील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बदल्यांवरून सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. ज्या अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात येत आहेत, त्या अधिकाऱ्यांच्या बदलीवर काही तासांत स्थगिती आणण्यात येतेय. त्यानंतर पुन्हा अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केले होते. तर या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे रेट कार्ड ठरले आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आलेले होते. पण त्यांच्या या आरोपानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सारखेच आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पाठोपाठ आता ठाकरे गटाने देखील तेच आरोप केल्याने याबाबत आता चर्चा करण्यात येत आहे. (Big corruption in the transfer of officers, Thackeray group also accused after NCP)

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा जन्मदिवस ‘देशद्रोही’ म्हणून साजरा करावा, नितेश राणेंची यूएनकडे मागणी

- Advertisement -

ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर बदल्यांच्या संदर्भात आरोप करत प्रश्न केले आहेत. तर मीडियाने देखील या बातम्या दाखवल्या पाहिजेत आणि यांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असेही दानवेंकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्यासाठी SIT नेमली असल्याचे सांगितले. परंतु आता मंत्रालयात भ्रष्टाचाराचा नाच सुरू आहे. महसूल विभाग, कृषी विभाग, वन विभाग या सगळ्या विभागात झालेल्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. महसूल विभागातील 66 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. या बदल्यांचे रात्री 4 वाजता आदेश निघाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

या बदल्यांचे आदेश हे वेबसाईटवर न नमूद होता, त्या बदल्यांची माहिती ही व्हॉट्सअपला पाठविण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याने त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच कोणता अधिकारी मंत्र्यांच्या घरांच्या बाजूला घिरट्या घालत आहेत, याची देखील चौकशी झाली पाहिजे, असे अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले. तसेच या बदल्यांची यादी का वेबसाईटवर टाकण्यात आली नाही, हे समोर आले पाहिजे. असेही ते म्हणाले.

कृषी विभागातील असे अनेक अधिकारी आहेत, जे बदल्यांसाठी अपात्र असताना देखील त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या बेकायदा बदल्यांबाबतची तक्रार ईडी आणि सीबीआयकडे करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी दानवे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. वनविभागात देखील 200 पेक्षा अधिक आरएफओंच्या बदल्या झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी भाजपच्या चार ते पाच आमदारांनी तक्रार केलेली आहे. परंतु या बदल्यांवर स्थगिती देण्यात आली असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात गट ‘अ’ च्या 15 तर गट ‘ब’ च्या 91 बदल्या झाल्या आहेत. यामध्ये 106 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या सगळ्या बदल्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्र राज्य सरकारला दिलेले आहे. या पत्रामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट कार्ड देण्यात आलेले आहेत. 5 लाख पासून 25 कोटी पर्यंतचे हे रेट कार्ड आहेत. यातील महसूल विभागात वेगवेगळ्या गोष्टीप्रमाणे वेगवेगळे रेट कार्ड ठरलेले आहेत. त्यामुळे या बातम्या सगळीकडे आल्या पाहिजेत, असे दानवे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -