घरताज्या घडामोडीशिवसेना आता बाळासाहेबांची राहिली नसून सोनिया सेना झालीये, भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप

शिवसेना आता बाळासाहेबांची राहिली नसून सोनिया सेना झालीये, भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप

Subscribe

माहिम पोलीस स्थानकात आंदोलनात हल्ला करण्यात सामील असलेल्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

राम मंदिर घोटाळाबाबातचे आंदोलन शांततापुर्वक सुरु असताना पोलिसांनी युवांना अटक केली. यामुळे पोलीस स्ठानकच्या दिशेना जाण्यासाठी गाडीकडे जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. असा आरोप भाजप महिला पदाधिकाऱ्या अक्षदा तेंडुलकर यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाई म्हणून न बघता धक्काबुक्की केली आहे. यामुळे आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही आहे. शिवसेना सेनाभवनासमोर एका बाईवर ४ पुरुष समोरून आंगावर येतात तिला खाली ढकलतात तिच्या अंगावर हात लावण्यात आले असा आरोप तेंडुलकर यांनी केले आहेत.

शिवसेना आमदार सदा सरवनकर यांनी सांगितल्यामुळे गर्दी झाली बाकीचे नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी जमा झाले. मिलींद वैद्य, श्रद्धा जाधव यांना लाज वाटली पाहिजे हे स्वतःला नगरसेवक म्हणतात एका बाईवर घोळक्याने हल्ला केला जातो. शिवसेना संपली आहे त्यांना भीती वाटायला लागली आहे. भाजप काम करत असून शिवसेना संपली असल्याचे त्यांना माहिती आहे. शिवसेना आता बाळासाहेबांची सेना राहिली नसून आता सोनिया सेना झाली असल्याचा गंभीर आरोप भाजप महिला पदाधिकारी अक्षदा तेंडुलकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

भाजप महिला पदाधिकारी अक्षदा तेंडुलकर यांनी माहिम पोलीस स्थानकात आंदोलनात हल्ला करण्यात सामील असलेल्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये स्थानिक राकेश देशमुख, संदिप देवळेकर, चंदू जगडे, राजू पाटणकर, मिलींद वैद्य, श्रद्धा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदू जगडे यांनी पोटात लाथ मारली असल्याचा आरोप अक्षदा तेंडुलकर यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण

श्रीराम मंदिरासाठीच्या परिसरासाठी घेतलेल्या जमीन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाच्या विरोधात भाजपकडून फटकार मोर्चा शिवसेनाभवनासमोर काढण्यात आला होता. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवान यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. परंतु शिवसेना भवनापासून ५ किमीच्या अंतरावर या मोर्चातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होते. परंतु काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे वाद उफाळला आणि मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. काही शिवसैनिक महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -