घरताज्या घडामोडीCorona Positive : चंद्रशेखर बावनकुळे कोरोना पॉझिटिव्ह, शेकडोंच्या गर्दीने केलं होते आंदोलन

Corona Positive : चंद्रशेखर बावनकुळे कोरोना पॉझिटिव्ह, शेकडोंच्या गर्दीने केलं होते आंदोलन

Subscribe

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. बावनकुळेंच्या संपर्कात शेकडो लोके आले असल्यामुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच राज्यात १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यामध्ये भाजप आमदारांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता भाजपचे आक्रमक नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन केले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बावनकुळेंची तब्येत ठीक असून त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बावनकुळे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती, असे ट्विट बावनकुळे यांनी केले आहे.

- Advertisement -

नाना पटोलेंविरोधातील आंदोलनात बावनकुळेंचा सहभाग

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पटोले यांनी मोदींनाच उद्देशून वक्तव्य केले असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. नाना पटोलेंविरोधात भाजप नेत्यांनी तीव्र आंदोलन केले होते. तसेच त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. बावनकुळेंच्या संपर्कात शेकडो लोके आले असल्यामुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

शरद पवारांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवारांनी स्वतः ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाचा राज्यात वेगाना प्रसार होत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शरद पवार गेले काही दिवस नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवारांनी कोरोनावर मात केल्यानंतर सर्व नियोजित कार्यक्रम पार पाडण्यात येतील असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : भाजप युती करुन खच्चीकरण करतो हे शिवसेनेला कळल होतं, नवाब मलिकांचे वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -