घरमनोरंजनतृप्ती देसाई श्रीवल्ली गाण्याच्या प्रेमात; पाहा त्यांचा डान्सचा मजेशीर व्हिडीओ

तृप्ती देसाई श्रीवल्ली गाण्याच्या प्रेमात; पाहा त्यांचा डान्सचा मजेशीर व्हिडीओ

Subscribe

सोशल मीडियावर सध्या पुष्पा चित्रपटाची तुफान क्रेझ पाहायला मिळतेय. इन्स्टाग्रामसह फेसबुक आणि इतर माध्यमांवरही पुष्पाचीच हवा पाहायला मिळेतय. अगदी सिने रसिकांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांना या चित्रपटाने भुरळ घातली. अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटातील श्रीवल्ली हे गाणं सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. आत्तापर्यंत इन्स्टाग्रामवर या गाण्यावर अनेक रिल्स आणि IGTV व्हिडीओ तयार होत आहेत. या गाण्यावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि बिग बॉसच्या स्पर्धक तृप्ती देसाई यांनी देखील प्रेम जडलं आहे. त्यांनी फेसबुकवर या गाण्यावर नाचतानाचा एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर आता चाहत्यांकडूनही भन्नाट कमेंट्स केल्या जात आहे.

दोन दिवसापूर्वी तृप्ती देसाईंनी श्रीवल्ली गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, श्रीवल्ली डान्स..मी आणि माझी नणंद सीमा पाटील… असंच काहीतरी.

- Advertisement -


महिलांच्या अनेक प्रश्नांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाईंना ओळखले जाते. अलीकडेच त्या मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसल्या. या शोनंतर त्यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे. मोठा चाहता आज त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतो. तृप्ती देसाई मूळ कोल्हापूरच्या आहेत. पण त्यांचं कुटुंब सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. पुण्याच्या SNDT महाविद्यालयातून त्यांनी होम सायन्सची पदवी घेतली.


Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आज 12500 ने घट, मात्र 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -