घरताज्या घडामोडीकाशिदशी अस्लम शेख यांचे नेमके संबंध काय? भाजप नेते मोहित भारतीय यांचा...

काशिदशी अस्लम शेख यांचे नेमके संबंध काय? भाजप नेते मोहित भारतीय यांचा सवाल

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी रविवारी मंत्री अस्लम शेख यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचं आयोजन करणारा ड्रग्ज पेडलर काशिफ खान यानं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना पार्टीचे आमंत्रण दिल्याचे आरोप करत काशिद आणि अस्लम शेख यांचे संबंध असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि काशिद खान यांचे काय संबंध आहेत, हे उघड झाले पाहिजे तसेच अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा नेते मोहित भारतीय यांनी केली आहे.

नवाब मलिक यांना पत्रकार परिषद घेत रविवारी अनेक गौप्यस्फोट केले. यावर मोहित भारतीय यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांच्या सर्व आरोपांना प्रतिउत्तर दिले. तसेच काशिद खान आणि अस्लम शेख संबंधांवरही भाष्य केले. मोहित भारतीय म्हणाले, काशिफ खान अस्लम शेख यांना वारंवार या ड्रग्ज पार्टीसाठी बोलवत होता. ओळख नसलेल्या व्यक्तीने एकदा आमंत्रण दिले असते. मात्र ओळख असल्याशिवाय कोणी वारंवार बोलावत नाही. एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार कसा आग्रह करु शकतो? असे अनेक सवाल करत अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भारतीय यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान अस्लम शेख आणि काशिफ खान यांचे संबंध असल्याचे आरोप मी नाही मलिकांनी केले आहेत. मी फक्त कोण मंत्री यात आहे, असे विचारले होते, मात्र मी कुणाचेही नाव घेतले नव्हते. मलिक यांनीच नाव घेतले आहे, असे भारतीय म्हणाले. काशिद खानने अनेक बड्या नेत्यांच्या मुलांना पार्टीत येण्याचे निमंत्रण दिले होते. किती वेळा हे निमंत्रण दिले? काशिदने या मुलांसोबत कुठे बैठक घेतली? काशिद खान आणि या नेत्यांच्या मुलांचे संबंध काय? याची चौकशी झाली पाहिजे. बरं झालं मलिक यांनी ही माहिती उघड केली. आत्ता सर्वच गोष्टी बाहेर येतील, असेही भारतीय म्हणाले.

नवाब मलिकांनी राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांच्या मुला- मुलींचे ड्रग्ज माफिया, ड्रग्ज पेडलरांसोबत काय संबंध आहेत? याचा खुलासा करावा. कारण त्यांची ही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. ड्रग्ज पेडरल आणि मंत्र्यांच्या मुलांमध्ये काय संभाषण व्हायचे. कसे बोलावले जायचे? यासंदर्भात माहिती मलिकांनीच मीडियासमोर आणली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा खुलासाही देशासमोर करावा अशी मागणी भारतीय यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -