घरताज्या घडामोडीखंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

Subscribe

समीर वानखेडे यांचा मित्र मोहित भारतीय हा अपहरणाचा सूत्रधार

आर्यन खानचे अपहरण करण्यात आले होते. मोहित भारतीय याच्या मेहुण्याकडून सापळा रचून आर्यनला यामध्ये अडकवण्याचा डाव झाला. त्यानंतर २५ कोटींची मागणी करण्यात आली. ही डील १८ कोटींमध्ये झाली. त्यातील ५० लाख उचलण्यात आले. मात्र, एका सेल्फीमुळे हा खेळ बिघडला. या अपहरणाचा खरा सूत्रधार मोहित भारतीय असून त्यांचे आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी केला.

मोहित भारतीय आणि समीर वानखेडे यांच्यातील बैठकीचे व्हिडिओ आम्ही समोर आणणार होतो. पण सीसीटिव्ही फुटेज बंद असल्याने ते मिळाले नाहीत, असा खुलासाही मलिक यांनी केला. २ ऑक्टोबरला कॉर्डीलिया क्रूझ ड्रग्स पार्टीवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमधील ३ लोकांना सोडण्यात आले. या तीन लोकांमध्येच मोठा खेळ झाला आहे, असे मलिक म्हणाले.

- Advertisement -

श्रीमंत लोकांना घाबरून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम वानखेडे करत होते. आधी सांगितल्याप्रमाणे हॉटेल ‘द ललित’ मध्ये काय घडायचे हे विजय पगारे यांनी मला भेटून सांगितले. समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीकडून कशाप्रकारे हॉटेल ललितमध्ये गैरव्यवहार सुरू होता हे समोर आले. समीर वानखेडे याने शहराला ‘पाताळ लोक’ बनवले आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. ही लढाई कोणत्याही शासकीय यंत्रणेच्या विरोधात नाही की कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. ही लढाई केवळ चुकीच्या लोकांविरुद्ध आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -