घरमहाराष्ट्रआम्ही साथ सोडल्यावर २०२४ मध्ये सेनेचे ५ खासदारपण निवडून येणार नाहीत -...

आम्ही साथ सोडल्यावर २०२४ मध्ये सेनेचे ५ खासदारपण निवडून येणार नाहीत – नारायण राणे

Subscribe

आम्ही साथ सोडली तर शिवसेनेचे २०२४ मध्ये पाच देखील खासदार निवडून येणार नाहीत असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. यावर बोलताना राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

शिवसेना पक्ष छोटासा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शिवसेनेचे खासदार निवडून आले. २०२४ मध्ये आम्ही साथ सोडल्यानंतर पाच खासदार पण निवडून येणार नाहीत, असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. ही यात्रा सुरू करताना आज राणेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निषणा साधला.

- Advertisement -

“मला कुणासमोर नतमस्तक व्हायचं तो माझा प्रश्न”

गोमूत्र आणि गोमूत्रं यासाठी आलो का? मला कुणासमोर नतमस्तक व्हावं असं वाटतं तो माझा प्रश्न आहे. इतरांचा हा प्रश्न नाही. ज्यांना गोमूत्र शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. गोमूत्रं प्यायचं तर पिऊ द्या. हे काय स्मारकाकचं सांगतात. ते स्मारक दलदलीत आहे. पँट वर करून तिथे जावं लागतं. राज्यात मुख्यमंत्री त्यांचा आहे. तरीही ही अवस्था आहे. जरा जागतिक दर्जाचे स्मारकं पाहा. ती कशी आहेत ते बघा, असा टोलाही त्यांनी लगावला.

अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करावा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा. मग कारभार करा, अशी जहरी टीका राणे यांनी केली.

- Advertisement -

गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धीकरण करा, नारायण राणेंचा शिवसेनेवर निशाणा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -