Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र “बाळासाहेबांचे हिंदुत्व राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं, तेव्हा तुम्हाला...”; भाजपच्या 'या' नेत्याकडून उद्धव ठाकरेंचा...

“बाळासाहेबांचे हिंदुत्व राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं, तेव्हा तुम्हाला…”; भाजपच्या ‘या’ नेत्याकडून उद्धव ठाकरेंचा समाचार

Subscribe

बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार मीच आहे, असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपच्या नेत्याने तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय.

पुण्यातील मानाच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीनंतर आता शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीचे लक्ष आता आगामी निवडणूकांकडे लागले आहे. दोन्ही पक्षाकडून येत्या निवडणूकीसाठी तयारीला सुरूवात झाली असून शिंदे-फडणवीस सरकारने आशिर्वाद यात्रा तर उद्धव ठाकरेंनी शिवगर्जना यात्रा सुरू केली. उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार मीच आहे, असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपच्या नेत्याने तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय.

रत्नागिरीतील खेड इथं रविवारी झालेल्या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली आहे. ती चोरण्याचा कोणालाही नाही. आम्ही शिवसेना असाच उल्लेख करणार असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी आमदार केले. तेव्हा तुम्हाला शिवसैनिक आठवला नाही का? त्यामुळे संधीसाधू तुम्ही आहात, असे प्रत्युत्तर विखे-पाटील यांनी दिले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे योगदान देश कधीच विसरणार नाही. मात्र सत्तेसाठी हे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेवून बांधले तेच भाजपम नेत्‍यांना संधीसाधू म्‍हणत आहेत, याचे आश्‍चर्य वाटते. भाजपने कधीही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. मात्र तुम्ही त्यांच्या विचारांचे आदर्शच खुर्चीसाठी बदलून टाकली, असं म्हणत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.

यापुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेवून जाणारे शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले आहे. जे जनतेच्या मनात होते तेच घडले. कोणताही निकाल यांच्या बाजूने आला की संस्था चांगली आणि विरोधात गेला की शिमगा करायचा आशी पद्धत सध्या ठाकरे गटाने सुरू केली आहे. मात्र सत्‍याचा स्विकार करण्‍याची मानसिकता ठेवा.” तसंच राज्यातील जनता सूज्ञ असल्याने येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना-भाजप सर्वत्र सत्तेवर दिसेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

“हे लोक परिवारवाद, घराणेशाहीवर बोलत असतात. होय, मी उद्धव ठाकरे अभिमानाने सांगतो की, बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे की, ते प्रबोधनकारांचे पुत्र आहेत. आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबत आहे”, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टिकास्त्र स़ोडले होते.

- Advertisment -