घरमहाराष्ट्रअर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांच्या रक्तचाचण्या

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांच्या रक्तचाचण्या

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मोफत रक्त चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आमदारासह ६०० जणांनी रक्तचाचण्या केल्या आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मोफत रक्त चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्त चाचणी शिबिरात स्वतः आरोग्यमंत्र्यांसह, मंत्री, राज्यमंत्री, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, अधिकारी अशा सुमारे ६०० जणांनी रक्तचाचण्या करून घेतल्या आहेत. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री विजय देखमुख यांनी स्वत: रक्तचाचण्या करून शिबिराचा शुभारंभ केला आहे.

१३० आमदारांनी केल्या चाचण्या

या शिबिरामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनखुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी देखील चाचण्या करून घेतल्या. त्याचबरोबर आमदार डॅा. निलम गोऱ्हे, विद्या चव्हाण, देवयानी फरांदे, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासह १३० आमदारांनी रक्तचाचणी करून घेतली आहे.

- Advertisement -

या करण्यात आल्या चाचण्या

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि क्रस्ना डायग्नॉस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सी.बी.सी., आर. एफ.टी, एल.एफ.टी., रक्तातील साखरेचे प्रमाण, एस.आर.कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह, व्हिटॅमिन डी, थायरॉईड अशा महत्वपूर्ण आठ चाचण्यांसह महिलांसाठी विशेष थायरॉईड चाचणी करण्यात आली होती. क्रस्ना डायग्नॉस्टिक्सचे व्यवस्थापक कपिल देशमुख, अमित गर्जे, डॉक्टर आणि तंत्रज्ञ अशा २२ जणांच्या पथकाने या चाचण्या केल्या आहेत.


हेही वाचा – म्हणून अधिवेशन संपवलं, वाचा विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री?

- Advertisement -

हेही वाचा – सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन लवकर गुंडाळणार? सूत्रांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -