घरमुंबई'थ्री-फाईव्हस्टार' हॉटेल्सवर एफडीएकडून धडक कारवाई

‘थ्री-फाईव्हस्टार’ हॉटेल्सवर एफडीएकडून धडक कारवाई

Subscribe

थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेल्सवर एफडीएने धडक कारवाई करत अन्नपदार्थ सुरक्षिततेचे, स्वच्छतेचे निकष आणि नियम न पाळणाऱ्या ३ हॉटेल्सचा परवाना रद्द करत टाळ ठोकण्यात आले आहे.

रस्त्यावरचे तेलकट आणि तळलेले अन्नपदार्थ खायचे नाही असे सांगण्यात येते. त्यानंतर खाण्यासाठी मोठ-मोठ्या हॉटेल्सचा आधार घेतला जातो. पण, आता या थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये जेवण बनवताना किती स्वच्छता असते? हे आपण कधीच पडताळून पाहत नाही. पण, आता या मोठ-मोठ्या हॉटेल्समधूनही अस्वच्छता असल्याच्या तक्रारी यायला सुरूवात झाली आहे.

एफडीएची विशेष मोहीम

याच पार्श्वभूमीवर एफडीएच्या अन्न अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रासह मुंबईतील हॉटेल्सची पडताळणी केली आहे. त्यानुसार, राज्यभरातील हॉटेल्स आणि रेस्टॉंरटच्या अन्नपदार्थाचा दर्जा कसा आहे? हे पडताळून पाहण्यासाठी १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी, २०१९ कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात आली. अन्नपदार्थ सुरक्षिततेचे, स्वच्छतेचे निकष आणि नियम न पाळणाऱ्या ३ हॉटेल्सचा परवाना रद्द करत त्यांना टाळं ठोकण्यात आलं आहे. वारंवार या हॉटेल्सना स्वच्छतेसाठी निर्देश देऊनही या हॉटेल्सच्या स्वच्छतेत पुरेसा बदल जाणवलेला नाही, त्यामुळे त्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी एफडीएकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, अशा हॉटेल्स आणि रस्त्यावरील अन्नपदार्थ विक्रेत्यांवर सतत कारवाईचा सपाटा एफडीएकडून लावण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईसह राज्यात एफडीएकडून मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यात आता काही दिवसांपूर्वीच तीन हॉटेल्सवर कारवाई केली गेली आहे. त्या हॉटेल्सना तीन- चार वेळा नोटीसा देण्यात आल्या होत्या. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांना बंद करुन सुधारणा करण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छ जागी अन्न तयार करत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार एफडीएच्या अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल्सची तपासणी सुरू केली. या मोहिमेद्वारे काही हॉटेल्स अन्नपदार्थांचा दर्जा राखत नसल्याचं समोर आलं. यात मुंबई-नाशिक हायवेजवळील मे. हॉटेल परिवार गार्डन, पालघरमधील गेटिवू फूड प्रा. लि. आणि शहापूर येथील एका हॉटेल्सचा समावेश आहे. यात दोन मॅन्युफॅक्चर कंपनी आणि हॉटेल्सचा समावेश आहे. शिवाय, एका बेकरीला ही बंद करण्यात आलं. ४ हजार टॉप हॉटेल्सची तपासणी केली गेली. आतापर्यंत २५० हून अधिक टॉप रेस्टॉरंट्स वर कारवाई करण्यात आली आहे.  – डॉ. पल्लवी दराडे, एफडीए आयुक्त


हेही वाचा – एफडीएच्या २०० फुड आऊटलेट्स विरोधात तक्रारी

- Advertisement -

हेही वाचा – पुन्हा भेसळयुक्त दूध, मिठाईवर एफडीएची कारवाई


 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -